भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपचे महेंद्र पाटील, बिनविरोध झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 07:55 PM2021-12-21T19:55:02+5:302021-12-21T19:56:04+5:30

पाटील यांची निवड जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात एकच जल्लोष केला.

BJP's Mahendra Patil elected unopposed as Bhiwandi Panchayat Samiti chairman | भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपचे महेंद्र पाटील, बिनविरोध झाली निवड

भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपचे महेंद्र पाटील, बिनविरोध झाली निवड

Next

भिवंडीभिवंडीपंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे महेंद्र पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने भिवंडी पंचायत समितीतील सभापती व उपसभापती पदाबाबत भाजप व शिवसेना यांच्यात सहमती झाली असून यानुसारच पंचायत समितीच्या सभापतीपदी काल्हेर गणातून निवडून आलेले महेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

सभापती नमिता गुरव यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी तहसीलदार अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी पंचायत समिती सभागृहात सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत महेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी अधिक पाटील यांनी भाजपच्या महेंद्र पाटील यांची सभापती निवड जाहीर केली.

 पाटील यांची निवड जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात एकच जल्लोष केला. या प्रसंगी गटविकास अधिकारी प्रदिप घोरपडे, भाजपचे आमदार महेश चौघुले,माजी आमदार योगेश पाटील,काल्हेर माजी सरपंच श्रीधर पाटील, जयवंत पाटील,पं. स. माजी उपसभापती गजानन असावरे,शैलेश शिंगोळे,ऍड.सिद्धार्थ भोईर आदी उपस्थित होते . 
 

Web Title: BJP's Mahendra Patil elected unopposed as Bhiwandi Panchayat Samiti chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.