भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 07:21 PM2020-07-09T19:21:27+5:302020-07-09T19:22:48+5:30
सदर क्लिप शहरात सर्वत्र व्हायरल झाली असून त्यावरून नरेंद्र मेहता पुन्हा वादात सापडले आहेत .
मीरारोड : कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने खाजगी हेल्पलाईन सुरु करणारे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी एका तक्रारदार नागरिकास चक्क अर्वाच्च व अश्लील शिवीगाळ केल्याने ते पुन्हा वादात सापडले आहेत.
मेहतांनी स्वःताचा व्हिडीओ शेअर करून कोरोना रुग्ण व नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता स्वतःच्या एका खाजगी संस्थेमार्फत हेल्प लाईन सुरु करत असल्याचे जाहीर करत भ्रमणध्वनी क्रमांक दिला होता. मेहतांना एका अनोळखी नागरिकाने त्या क्रमांकावर कॉल केला होता. त्याने फॅमिली केअर व उमराव या खाजगी रुग्णालयात जास्त देयके आकारून लूट माजवली असल्याने त्याचे काही तरी करा असे सांगितले. त्यावर मी लोकांना एडमिट करून घेतले जात नसेल, जेवण मिळत नसेल आदी समस्येसाठी हेल्प लाईन नंबर दिला असून बिलांचा प्रश्न माझा नाही. ते तुम्हालाच बघायचे आहे असे मेहतांनी सांगितले .
त्यावर फेमिली केअर रुग्णालय तुमचेच असल्याचे त्या नागरिकाने सांगताच ते रुग्णालय माझे नसून मी इमारत भाड्याने दिली आहे आणि त्या रुग्णालयात कोणी जाऊ नये,असे मेहतांनी चिडून सांगितले. त्यावर नागरिकाने चिडता कशाला असे सांगत रुग्णालयाची इमारत तोडून जनतेची जमीन जनतेला द्या सांगताच मेहतांनी अश्लील आणि अर्वाच्च शिवीगाळ सुरु केली.
महापालिकेची जागा, खासगी वापर
सदर क्लिप शहरात सर्वत्र व्हायरल झाली असून त्यावरून नरेंद्र मेहता पुन्हा वादात सापडले आहेत . त्यांच्यावर विविध स्तरातून टीकेची झोड उठत आहे . वास्तविक सदर रुग्णालयाची जागा ही महापालिकेच्या प्रसूतिगृह आणि दवाखाना या आरक्षणाची आहे. त्या ठिकाणी सध्या रुग्णालय व माजी महापौर डिंपल मेहता यांचे कार्यालय सुरु आहे. पालिकेला करार प्रमाणे जागा बांधून हस्तांतरित केली नसल्याने देखील मेहता आणि त्यांची कंपनी वादात सापडली होती .
अन्य महत्वाच्या बातम्या...
परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार
भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला
सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश
शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय
ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी