ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका दुटप्पी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:40 AM2021-09-19T04:40:33+5:302021-09-19T04:40:33+5:30
ठाणे : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वेळीच त्यांच्याजवळ तयार असलेला इम्पॅरिकल डाटा ...
ठाणे : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वेळीच त्यांच्याजवळ तयार असलेला इम्पॅरिकल डाटा कोर्टाला दिला नाही. त्यामुळे ओबीसी समाजावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली आहे. आरक्षणासंदर्भात भाजपकडून जिल्हावार आंदोलने छेडली जात असली तरी ती पूर्णपणे थोतांड आहे, असा आरोप करून आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या येथील ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी शनिवारी आयोगाला दिला आहे.
केंद्र सरकारला ओबीसी आरक्षण जाणूनबुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पॅरिकल डाटा दिलेला नाही. भाजपाच्या केंद्र सरकारकडे असलेला इम्पॅरिकल डाटा न देता राज्य सरकारवर इम्पॅरिकल डाटा देण्यासंदर्भात दबाव आणणे ही दुटप्पी भूमिका आहे. राज्य सरकारमार्फत मागासवर्गीय आयोग नेमून इम्पॅरिकल डाटा मिळण्यास वेळ लागणार आहे. केंद्र सरकारने त्यांच्याजवळ असलेला जनगणनेचा डाटा महाराष्ट्राला दिला, तर तो जमा करण्यास महाराष्ट्र सरकारला सोपे जाईल.