भाजपची युवा संकल्प सायकल यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:10+5:302021-08-17T04:45:10+5:30
डोंबिवली : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे म्हणजेच अमृत महोत्सव निमित्ताने भाजपच्या वतीने शहरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत ...
डोंबिवली : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे म्हणजेच अमृत महोत्सव निमित्ताने भाजपच्या वतीने शहरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आबालवृद्धांनी उदंड प्रतिसाद देत, सायकल चालविण्याचा आनंद लुटला. या सायकल रॅलीत पाच वर्षांचा चिमुकला आणि ६८ वर्षांच्या आजोबांनी त्यात सहभाग घेतला होता. सारंग मुळे हे त्यांच्या ३३ वर्षे जुन्या असलेल्या सायकलवरून या रॅलीत सहभागी झाले होते. डोंबिवली येथे आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब, युवामोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, माजी नगरसेवक संदीप पुराणिक, अपूर्व कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू मैदान येथून सायकल रॅलीस प्रारंभ झाला. स्मृतिस्थळ, घरडा सर्कल येथे भारत मातेचा जयघोष करून, शौर्य स्मारकास अभिवादन करण्यात आले.