धक्कादायक! एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोक्यासाठी केला अघोरी जादूटोणा  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:35 AM2020-12-17T03:35:06+5:302020-12-17T06:55:49+5:30

गुन्हा शाखेच्या पथकाने एकाला केली अटक

black magic done to endanger Eknath Shinde's life | धक्कादायक! एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोक्यासाठी केला अघोरी जादूटोणा  

धक्कादायक! एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोक्यासाठी केला अघोरी जादूटोणा  

Next

जव्हार : राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अंमलात आणला, मात्र अजूनही अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी याच अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे.

विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होऊन दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे.  कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अघोरी जादूटोणा करणाऱ्या सूत्रधारांचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: black magic done to endanger Eknath Shinde's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.