दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 24, 2024 08:13 AM2024-10-24T08:13:09+5:302024-10-24T08:13:31+5:30

दिवाळीनिमित्त श्वान आणि मांजरीसाठी आले रंगीबेरंगी कपडे

Blazers, jackets and frocks for pets are hitting the market for Diwali in Thane | दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक

दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: दिवाळी सणाची खरेदीला सुरूवात झाली आहे. रंगीबेरंगी कपड्यांनी दुकाने सजली आहेत. मग पाळीव प्राणी तरी का मागे राहतील. ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर देखील ब्लेझर, जॅकेट अन फ्रॉकब्लेझर, जॅकेट अन फ्रॉक दिसून येणार आहे. ठाण्यात श्वान आणि मांजरीसांठी दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी कपडे आले आहेत. इतकेच नव्हे तर श्वानासाठी ब्लेझर तर मांजरीसाठी चनिया चोली देखील आली आहे. त्यामुळे प्राणी प्रेमी आपल्या लाडक्या श्वान अन मांजरीसाठी कपड्यांची खरेदी करताना दिसत आहेत.

दिवाळीत इतर खरेदीपैकी सर्वांत महत्त्वाची खरेदी असते ती नव्या कपड्यांची. प्रत्येकाला दिवाळीला नवे कपडे घ्यावेसे वाटतात. त्यासाठी बाजारात नवनविन डिझाईन्स देखील आलेल्या असतात. सध्या राम मारुती रोड, गोखले रोड. जांभळी मार्केट पासून मॉल्सपर्यंत नवनविन प्रकारांचे कपडे दिवाळी निमित्त बाजारात आले आहे. या सणाच्या निमित्त विशेष करुन पारंपारिक कपडे बाजारात दिसून येतात. हा सण साजरा करण्यापासून प्राणी तरी का मागे राहतील. घरातील पाळीव प्राणी म्हणजे आपल्या कुटुंबातील एक सदस्यच असतो. त्याला त्या त्या कुटुंबातील लोक जीवापाड प्रेम करतात. त्याचा वाढदिवस साजरा करणे, सण आला की त्याची ओवाळणी करत असल्याचेही सोशल मीडियावर व्हीडीओद्वारे पाहायला मिळतात.

मग आपल्या लाडक्या ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलो सोबत दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी श्वान आणि मांजरीसाठी देखील कपड्यांची खरेदी सुरू आहे. प्रमोद निंबाळकर म्हणाले की, आपापल्या घरातील पाळीव प्राण्याच्या साईज आणि कलर नुसार आम्ही तसे कपडे बनवून देतो. एखाद्या प्राण्याचा रंग गडद असेल तर त्याच्यासाठी हलक्या रंगांचे तर प्राणी क्रीम, किंवा सफेद रंगांचा असेल तर त्यासाठी गडद रंगांचे कपडे खरेदी केले जातात. दिवाळीसाठी अनेक प्राणीप्रेमींनी कपडे बनवायला दिली आहेत. त्यांना चार ते पाच दिवसांत बनवून दिले जातात.

हे आलेत कपडे- पोल्का डॉट, चनिया चोली, ब्लेझर, शेजवानी, टीशर्ट, बांधणीचे शर्ट, खणाचे फ्रॉक, ब्रॉकेट फ्रॉट, जॅकेट, त्याचबरोबर बंडाना आणि बो देखील आहेत.

हे आहेत दर

  • टीशर्ट : ५०० - १५०० रु.
  • शेरवानी : १५०० - ३००० रु.
  • फ्रॉक : १००० ते ३००० रु.
  • शर्ट : १००० ते १५०० रु.

 

 

Web Title: Blazers, jackets and frocks for pets are hitting the market for Diwali in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.