खाजगी बसेसना आरटीओचा आशीर्वाद : टीएमटीच्या बैठकीत प्रशासनाचा आरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:18 AM2017-08-09T06:18:24+5:302017-08-09T06:18:24+5:30

ठाणे परिवहन सेवेत सुधारणा झाल्यानंतर खाजगी बस बंद होतील असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. परंतु, अवस्था सुधारल्यानंतरही खाजगी बसवर कारवाई का होत नाही, त्यांना पाठबळ कोणाचे मिळत आहे, असे अनेक सवाल करून परिवहन समितीच्या बैठकीत विरोधकांनी या बसवर कारवाईची मागणी केली.

The blessings of RTO on private buses: The allegations of administration in the TMT meeting | खाजगी बसेसना आरटीओचा आशीर्वाद : टीएमटीच्या बैठकीत प्रशासनाचा आरोप  

खाजगी बसेसना आरटीओचा आशीर्वाद : टीएमटीच्या बैठकीत प्रशासनाचा आरोप  

Next

ठाणे : ठाणे परिवहन सेवेत सुधारणा झाल्यानंतर खाजगी बस बंद होतील असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. परंतु, अवस्था सुधारल्यानंतरही खाजगी बसवर कारवाई का होत नाही, त्यांना पाठबळ कोणाचे मिळत आहे, असे अनेक सवाल करून परिवहन समितीच्या बैठकीत विरोधकांनी या बसवर कारवाईची मागणी केली. प्रशासन कारवाई करण्यास तयार आहे, परंतु, आरटीओकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने ती करणे शक्य होत नसल्याचे परिवहन प्रशासनाने व्यक्त केले. असे असले तरी एका आठवड्याच्या आत आरटीओ आणि परिवहन संयुक्त पाहणी करूनही कारवाई करण्याचे आश्वासन प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिले.
टीएमटीच्या उडालेल्या बोजवाºयाचा फायदा घेऊन मागील कित्येक वर्षांपासून खाजगी बसचालकांनी आपला धंदा घोडबंदर मार्गावर तेजीत सुरु केला. यामध्ये आरटीओसह वाहतूक पोलिसांचेही त्यांनी बांधून घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फारशीा कारवाई होतांना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी कोपरीतील रहिवाशांनीच रस्त्यावर उतरुन या बसेस विरुद्ध एल्गार पुकारला होता. त्यानंतर काही दिवस त्या बंद होत्या. परंतु, पुन्हा त्यांनी नौपाड्यात शिरकाव केला. काही बस, गावदेवी तर काही नौपाड्यातून सुटू लागल्या होत्या. काही दिवसानंतर, वातावरण शांत झाल्यानंतर त्यांनी वेग पकडण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान, परिवहनचा कारभार सुधारल्यानंतर त्या बंद होतील असा दावा परिवहन प्रशासनाने केला होता. परंतु, आज परिवहनचा कारभार बºयापैकी सुधारला आहे. टप्प्याटप्प्याने बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होत आहेत, इलेक्ट्रीक, इथेनॉल, तेजस्वीनी अशा अनेक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे परिवहनचा कारभार नक्कीच सुधारण्यास मदत होणार आहे. असे असतांनादेखील खाजगी बसवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल काँगे्रसचे सदस्य सचिन शिंदे यांनी केला. त्याला शिवसेनेचे राजेश मोरे यांनी देखील पाठिंबा देऊन मागील महिन्यात यावर चर्चा झाली होती. परंतु, अद्यापही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली.

आरटीओकडून पत्राला प्रतिसाद नाही

खासगी बसवर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडून आरटीओला पत्र व्यवहार केला आहे. परंतु, त्यांच्याकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संबधींत विभागाच्या अधिकाºयांशी भेट घेऊन पुढील आठवड्यात संयुक्तपणे पाहणी करून या बसवर कारवाई करण्याचे आश्वासन माळवी यांनी दिले.

Web Title: The blessings of RTO on private buses: The allegations of administration in the TMT meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.