अंध मतदारांनी ठाणे कॉलेजमध्ये घेतला प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव!

By सुरेश लोखंडे | Published: March 4, 2024 08:15 PM2024-03-04T20:15:12+5:302024-03-04T20:15:32+5:30

बाेटाला शाई लावून त्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली.

Blind voters experienced real voting in Thane College | अंध मतदारांनी ठाणे कॉलेजमध्ये घेतला प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव!

अंध मतदारांनी ठाणे कॉलेजमध्ये घेतला प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव!

ठाणे : मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जोशी बेडेकर कॉलेजमधील अंध विद्यार्थ्यांसाठी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांना प्रत्येक्ष मतदानाची अनुभवही करून देण्यात आला. यावेळी त्यांच्या बाेटाला शाई लावून त्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली.

या अंध मतदारांना मतदानाची संधी मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही या काॅलेजमध्ये पार पडले. ठाणे जिल्हा निवडणूक कार्यालय, १४८-ठाणे विधानसभा मतदारसंघ स्नेहांकित हेल्प लाइनच्याअध्यक्षा प्रमिला भट, कार्यकर्ती नूपूर जोशी व जोशी बेडेकर कॉलेजचे अतूल्य इनक्लूझिव सेल या स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सहकार्य केले.उपस्थित अंध मतदारांना डेमाे मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या ईव्हीएमवर तहसिलदार स्मिता मोहिते यांनी दिले.

अंध मतदारांना प्रत्यक्ष मतदान कसे करायचे, याबाबत त्यांच्या मनामध्ये असलेल्या सर्व शंकाचे निरसन करण्यात आले. त्याकरिता डमी मतदान केंद्र तयार करणे, डमी ब्रेललिपी मतपत्रिका तयार करून, मतदान केल्यानंतर मार्कर पेनाने त्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली. याबाबत अंध मतदारांनी प्रशिक्षण दिल्याबाबत व निवडणुकीमध्ये मतदान करता येणार असल्याबाबत समाधान व्यक्त केले, अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली.

Web Title: Blind voters experienced real voting in Thane College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे