खाडीकिनारा विकासाला भूमाफियांचा अडसर, बेकायदा बांधकामे तोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 03:18 AM2017-11-24T03:18:41+5:302017-11-24T03:19:01+5:30
डोंबिवली : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण-डोंबिवली शहराला लागून असलेल्या खाडीकिना-याचा विकास केला जाणार आहे.
डोंबिवली : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण-डोंबिवली शहराला लागून असलेल्या खाडीकिना-याचा विकास केला जाणार आहे. मात्र, डोंबिवलीत खाडीकिनाºयानजीक महापालिका अधिकाºयांच्या साथीने भूमाफियांनी तेथे बेकायदा बांधकामे केली आहेत, असा आरोप शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केला आहे.
बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई न केल्यास प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर २७ नोव्हेंबरपासून ७२ तासांचे उपोषण केले जाईल, असा इशारा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांना दिला आहे.
खाडीकिनाºयावर मातीचा भराव टाकून बेकायदा बांधकामे केली जात आहेत. मात्र, केडीएमसीचे ‘ह’ प्रभाग क्षेत्राचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. खाडीकिनारा अर्थात सीआरझेड हद्दीतील बेकायदा बांधकामांविरोधात जिल्हाधिकाºयांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
राज्याच्या गृह विभाग बंदरे व सागरी मंडळाने मे २०१७ मध्ये बंदर निरीक्षकांना खाडीकिनारी असलेली बेकायदा बांधकामे हटवावीत व त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डानेही कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकाºयांना खाडीकिनाºयालगतच्या बेकायदा बांधकामांवर संयुक्त कारवाई करण्याबाबत ८ मे २०१७ ला कळवले आहे. किनाºयावरील उच्चतम भरतीरेषेपासून जमिनीकडे ५० यार्डपर्यंत जागा ही स्थानिक बंदराची हद्द दर्शवते.
>नियोजन करूनच कारवाई
नियोजन करून कारवाई करावी, असे मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी कळवले. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ म्हात्रे यांनी दिला आहे. खाडीकिनारा विकासाला मेरीटाइम बोर्डाची मंजुरी मिळाली असली तरी तेथील बेकायदा बांधकामे हटवावीत, यासाठी म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिला.