कामगारांचा रास्ता रोको ; जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च

By सुरेश लोखंडे | Published: April 17, 2023 06:22 PM2023-04-17T18:22:04+5:302023-04-17T18:22:56+5:30

या सुपर मॅक्स कंपनीच्या राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कम्रचार्यांनी व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात सकाळी एकत्र येऊन तीन हात नाका येथे रास्ता रोखो केला.

Block the path of workers; Long March on the Collectorate | कामगारांचा रास्ता रोको ; जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च

कामगारांचा रास्ता रोको ; जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येथील वागळे इस्टेटमधील सुपरमॅक्स पर्सनल केअरकंपनीच्या कामगारांनी सकाळी तीन हात नाक्यावर रस्ता रोखो आंदोलन केले. त्यानंतर या कामगारांनी लॉग मार्च करून ठाणे जिल्हाधिकारी कायार्लयावर कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानीि विरोधात धरणे आंदोलन छेडून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी कामगारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले.

या सुपर मॅक्स कंपनीच्या राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचार्यांनी व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात सकाळी एकत्र येऊन तीन हात नाका येथे रास्ता रोखो केला. या कामगारांचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष संभाजी कुहार्डे, युनीट सचीव तुळशीदास कदम, राजेंद्र पाटील, शशांक खेर, शंकर फापाळे आदींनी केले. या रास्ता रोखो नंतर या कामगारांनी लॉंग मार्चव्दारे ठाणे जिल्हाधिाकारी कायार्लय काठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी परदेशी यांच्याकडे निवदन देऊन प्रलंबीत मागण्यांसह रखडलेले वेतन मिळवण्यासाठी निवदेन दिले.

या कंपनीमध्ये एक हजार १५६ कायमस्वरूपी कामगार असून १३२ सेवानिवृत्त कामगार व ४५० स्टाफ कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर कामगार मिळून दोन हजार ५०० कामगार आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाने वेतन न दिल्यामुळे कामगार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे संतापलेल्या या कर्मचार्यांनी जुलै ते मार्चपर्यंतचे थकीत ३० कोटी ५० लाखांचे वेतन मिळवण्चयाची मागणी प्राधान्याने केली. तर दोन वषार्चा बोनस दोन कोटी ७५ लाखांचा, रजेचे एक कोटी ८० लाख रुपए, सेवानिवृत्त कामगारांचे ग्रॅज्युटी आणि इतर देणी तब्बल १९ कोटी, कोरोना काळात मयत कामगारांच्या वारसाला मयत ग्रॅज्युटी आदी १२५ कोटी रुपए आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

Web Title: Block the path of workers; Long March on the Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.