ठाण्यात वागड वर्धमान जैन संस्थेच्या शिबिरात ४०० दात्यांचे रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 11:10 PM2021-05-02T23:10:20+5:302021-05-02T23:14:24+5:30

सध्या वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, रक्ताचीही मोठी निकड भासत आहे. याच पार्श्वभूमीवर वागड वर्धमान जैन संस्थेच्या वतीने रविवारी ठाणे शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये आठ तासांमध्ये तब्बल ४०० दात्यांनी रक्तदान केले.

Blood donation of 400 donors at Vagad Vardhman Jain Sanstha camp in Thane | ठाण्यात वागड वर्धमान जैन संस्थेच्या शिबिरात ४०० दात्यांचे रक्तदान

महिला दात्यांचीही संख्या लक्षणीय

googlenewsNext
ठळक मुद्दे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद महिला दात्यांचीही संख्या लक्षणीय

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सध्या वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, रक्ताचीही मोठी निकड भासत आहे. याच पार्श्वभूमीवर वागड वर्धमान जैन संस्थेच्या वतीने रविवारी ठाणे शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये आठ तासांमध्ये तब्बल ४०० दात्यांनी रक्तदान केले. ठाण्यासह राज्यभरात एकाच दिवशी १५ ठिकाणी जैन समाजाने हा उपक्रम राबवून पाच हजारांपेक्षा अधिक बॅग रक्त संकलन केले.
वागड संस्थाद्वारे वर्धमान जैन स्थानक मासुंदा तलाव येथे २ मे रोजी या भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीराचे उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत झालेल्या या शिबिराला तरुणांसह महिला वर्गानेही मोठा प्रतिसाद दिला. यावेळी ठाणे भाजपा व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शाह, दिलीप शाह तसेच वागड संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य जितेंद्र जैन यांच्यासह भाजपचे माजी शहर अध्यक्ष संदीप लेले आणि नगरसेवक संजय वाघुले आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation of 400 donors at Vagad Vardhman Jain Sanstha camp in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.