ठाण्यात संजय भोईर फाउंडेशनने आयोजित केलेल्या शिबिरात ५०० दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:34 AM2021-02-08T04:34:57+5:302021-02-08T04:34:57+5:30
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजय भोईर फाउंडेशनच्या वतीने रविवारी ठाण्यातील ढोकाळी येथील ...
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजय भोईर फाउंडेशनच्या वतीने रविवारी ठाण्यातील ढोकाळी येथील शरदचंद्र पवार इनडोअर स्टेडियम येथे आयोजित शिबिरामध्ये ५०० दात्यांनी रक्तदान केले. पालकमंत्री शिंदे यांनीही या शिबिराला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी आरोग्य आणि नेत्रचिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
९ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री शिंदे यांचा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याबरोबरच रक्तदात्यांची संख्या वाढावी, याउद्देशाने स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी शिंदे यांनी रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. तरुण पिढीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेविका उषा भोईर आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. टीसा ब्लड बँकेच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले. लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने नेत्रचिकित्साचे आयोजन केले होते. डॉ. शीतल थोटे यांनी आरोग्य शिबिरासाठी सहकार्य केले. त्यामध्ये तरुण आणि महिला दात्यांची संख्या लक्षणीय होती. विकेश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.