ठाण्यात रोटरीच्या शिबिरात अंध तरुणाचेही रक्तदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 12:13 AM2021-07-07T00:13:48+5:302021-07-07T00:21:37+5:30
रविवारी ठाण्यातील सिद्धांचल फेज सहाच्या कम्युनिटी हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे मृगांक वैद्य या अंध तरुणासह ४२ दात्यांनी यावेळी रक्तदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रोटरी क्लब आॅफ ठाणे नॉर्थ, रोट्रॅक्ट क्लब आॅफ ठाणे नॉर्थ आणि रोटरी क्लब आॅफ ग्रीनस्पॅन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वामनराव ओक ब्लड बँकेच्या सहकार्याने रविवारी ठाण्यातील सिद्धांचल फेज सहाच्या कम्युनिटी हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे मृगांक वैद्य या अंध तरुणासह ४२ दात्यांनी यावेळी रक्तदान केले.
रोटरीतर्फे आयोजित केलेल्या या रक्तदानाच्या उपक्र मास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच आपलाही खारीचा वाटा असावा, अशी प्रतिक्रीया व्यक्त करीत मृगांक याने या शिबिरामध्ये आपला आवर्जून सहभाग नोंदविला. यावेळी रोटरी क्लब आॅफ ठाणे नॉर्थचे पूर्व प्रांतपाल डॉ.मोहन चंदावरकर, अध्यक्ष सुनिल सोमण, ग्रीनस्पॅन च्या डॉ.जयवंत, रोट्रॅक्ट अध्यक्ष आणि इतर सभासद मोठया संख्येने उपस्थित होते, अशी माहिती रोटरी क्लब आॅफ ठाणे नॉर्थचे अमोल नाले यांनी दिली.