डोंबिवलीत रक्तदान शिबिराने शिवसंपर्क मोहिमेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:12+5:302021-07-12T04:25:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून रविवारपासून शिवसंपर्क मोहीम सुरू झाली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ ...

Blood donation camp in Dombivali launches Shiv Sampark campaign | डोंबिवलीत रक्तदान शिबिराने शिवसंपर्क मोहिमेचा प्रारंभ

डोंबिवलीत रक्तदान शिबिराने शिवसंपर्क मोहिमेचा प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून रविवारपासून शिवसंपर्क मोहीम सुरू झाली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ डोंबिवलीत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ‘लोकमत’च्या ‘रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर भरवून केला. सायन हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात सायंकाळपर्यंत ६० जणांनी रक्तदान केले.

पूर्वेतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शहर शाखेत सकाळी ९.३० वाजता शिबिराला सुरुवात झाली. यावेळी मोरे म्हणाले, कोरोनाच्या महामारीत ‘लोकमत’ने राज्यभरात रक्तदान शिबिरे भरवून रक्ताचे नाते जपले आहे. त्यात आमचाही खारीचा वाटा असून, जास्तीत जास्त युवकांनी पुढे येऊन रक्तदान करावे. यावेळी राजेश कदम, विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, कार्यालय प्रमुख सतीश मोडक, नारायण गायकवाड, युवा शिवसैनिक सागर जेधे, शिवसैनिक, महिला आघाडीच्या प्रतिनिधी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील प्रत्येक विभाग प्रमुख, शाखाप्रमुख तसेच शिवसेना प्रणीत रिक्षाचालक युनियनच्या सदस्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. शिवसैनिक आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे कोरोना काळात एक मोठा आकडा या शिबिरातून गाठणे शक्य झाल्याचे रक्तसंकलन पिढीच्या समुपदेशक सुनीता घमंडी, डॉ. शगुन नगरे, डॉ. पल्लवी घुनावत, डॉ. श्वेता नेमाडे यांनी सांगितले.

------

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्वत्र शिवसैनिक रक्तदान करत आहेत. ‘लोकमत’च्या ‘रक्ताचं नातं’ या संकल्पनेत सहभागी होऊन मी देखील खसदार म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले. यापुढेही सहकार्य राहील.

- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण.

---------------

Web Title: Blood donation camp in Dombivali launches Shiv Sampark campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.