ठाण्यात रक्तदानाने साजरी होणार दिवाळी पहाट, संगीतमय सेलिब्रेशन रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 03:24 PM2020-11-13T15:24:38+5:302020-11-13T15:35:15+5:30
Diwali News : दिवाळीची पहिली आंघोळ झाली की पहिली पहाट मित्र-मैत्रीणींसह साजरी करण्यासाठी सगळी तरूणाई ठाण्यातील तलावपाळीला जमा होते.मात्र यंदा संगीतमय कार्यक्रमांनी नव्हे तर रक्तदानाच्या उपक्रमाने ठाण्यात दिवाळी पहाट होणार आहे.
ठाणे - दिवाळीची पहिली आंघोळ झाली की पहिली पहाट मित्र-मैत्रीणींसह साजरी करण्यासाठी सगळी तरूणाई ठाण्यातील तलावपाळीला जमा होते.मात्र यंदा संगीतमय कार्यक्रमांनी नव्हे तर रक्तदानाच्या उपक्रमाने ठाण्यात दिवाळी पहाट होणार आहे.
संगीताच्या तालावर आधुनिक ध्वनीयंत्रणा आणि म्युझिकच्या तालावर थिरकणारी तरूण मुले-मुलींना यंदा कोरोनाच्या संकटामुळे हे दिवाळी सेलिब्रेशन करता येणार नाहीत. मात्र सध्याच्या काळात सगळीकडे आढळणारी रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी रक्तदान शिबिर दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते ११ दरम्यान. तर राजावंत ज्वेलर्स समोर, तलावपाळी येथे आयोजित करण्यात आले आहे. दिवाळीच्या दिवसात रक्तदानसारखे महान कार्य करून आपण एखादा जीव वाचवू शकणार आहोत.