रक्तदान आपले सामाजिक कर्तव्य : हेमा पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:48+5:302021-07-04T04:26:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : रक्तदान हे आपले सामाजिक कर्तव्य असून, प्रत्येकाने ते निःस्वार्थ भावनेने केले पाहिजे, असे प्रतिपादन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रक्तदान हे आपले सामाजिक कर्तव्य असून, प्रत्येकाने ते निःस्वार्थ भावनेने केले पाहिजे, असे प्रतिपादन कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी केले.
कोरोना काळातील दुसऱ्या लाटेत राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक रुग्णांना या काळात आपला जीव गमवावा लागला. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून, रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी हेमा नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी लोकमत, कल्याण विकास फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कल्याण डायमंड व संकल्प ब्लड बँकेने कल्याणमधील पारनाका येथील राजस्थान हॉलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
हेमा पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतीही भेटवस्तू न स्वीकारता रक्तदान शिबिर भरविले. कल्याणमधील अनेक मान्यवरांनी या शिबिराला भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यात भाजप कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मोहने टिटवाळा अध्यक्ष शक्तिवान भोईर, ठाणे विभाग प्रभारी राजाभाऊ पातकर, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते दिनेश तावडे, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव अनिल पंडित, भाजप शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष निखिल चव्हाण, परिवहन समिती सदस्य कल्पेश जोशी, माजी नगरसेविका विनिता म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे चार्टर अध्यक्ष बाळासाहेब एरंडे, अध्यक्षा निशिगंधा वनसुत्रे, सचिव संजय पैठणकर, प्रोजेक्ट प्रमुख राजेश चासकर, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कल्याण डायमंडचे चार्टर अध्यक्ष विवेक जगदळ, अध्यक्ष अभिजित बावस्कर, सचिव श्रेया आव्हाड, प्रोजेक्ट प्रमुख अभिषेक शिंदे, नुपूर डोंबे व संकल्प ब्लड बँकेच्या टीमचा समावेश आहे.
त्याचबरोबर मनीषा केळकर, हिमांशू पवार, संतोष शिंगोळे, नवनाथ पाटील, संदीप तरे, अनंता पाटील, जयंत टावरे, संदीप पाटील, मयूरेश आगलावे, तात्या टूमकर, समृद्धी देशपांडे, प्रकाश पाटील, श्रीधर देवस्थळी, एस. एम. जोशी, सुहास चौधरी, महेश चौधरी, सुनील मारवाडी, समीर मारवाडी, सिद्धेश तेली, विशाल शेलार, आर. के. सिंग, राजेश सिंग, मिलिंद सिंग, रवी गायकर, जनार्दन कारभारी, सदा कोकणे, संदीप तरे, विवेक जाधव, किशोर खैरनार, रोहित जाधव, अनंत किनगे, गजानन पाटील, प्रीती दीक्षित, दीपा शहा, कल्पना पिल्ले, नीता देसले, ज्योती भोईर, पल्लवी डेरवणकर, कल्पना पिल्ले, संगीता कमलाकर घोलप, शशिकांत पाटील, रमेश मांडवे, मंदार संत, सतीश काळे, सोपारकर, विजया जाधव, विलास मामा रणदिवे, सुचित्रा राजेंद्र पाटील, मोहन कोनकर, हेमंत गायकवाड, अशोक म्हात्रे, राणा सिंग आकाश, अमर पाटील, संतोष तरे, संतोष विशे, संदीप आढवकर, नीता देसले, भारत कडाली, लक्ष्मी अहिरे, संतोष टेकडीकर, बाळाराम शेलार आणि माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.
----------------