फुलवतात सांजवात

By admin | Published: October 30, 2016 02:36 AM2016-10-30T02:36:47+5:302016-10-30T02:36:47+5:30

प्रत्येक जण दिवाळी आपल्या घरच्यांसोबत, मित्रांसोबत साजरी करतात. या दिवाळसणात मनासारखा खर्च करून धम्माल-मस्ती सुरू असते. परंतु, काही जण असेही आहेत,

Bloom | फुलवतात सांजवात

फुलवतात सांजवात

Next

- अजित मांडके, ठाणे

प्रत्येक जण दिवाळी आपल्या घरच्यांसोबत, मित्रांसोबत साजरी करतात. या दिवाळसणात मनासारखा खर्च करून धम्माल-मस्ती सुरू असते. परंतु, काही जण असेही आहेत, जे दिवाळी काहीशा वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. त्यातील एक म्हणजे ठाण्यातील सरस्वती नॅशनल फाउंडेशन ही संस्था. या संस्थेतील पदाधिकारी गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्यातील विविध वृद्धाश्रमांत जाऊन वृद्धांबरोबर अनोखी दिवाळी साजरी करीत आहेत.
दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी... असे म्हणत प्रत्येक जण आपापल्या परीने दिवाळी साजरी करतो. परंतु, या पलीकडेही जाऊन काही जण ती वेगळ्या पद्धतीने साजरी करत असतात. ठाण्यातील सरस्वती नॅशनल फाउंडेशन हीदेखील त्यातीलच एक संस्था. ती गेल्या १० वर्षांपासून आगळ्यावेगळ्या पद्धतीने वृद्धांसोबत दिवाळी साजरी करते.
या संस्थेची मुहूर्तमेढ २००७ मध्ये रोवली गेली. परंतु, तिचे रजिस्ट्रेशन २०११ मध्ये झाले. मात्र, या संस्थेचे कार्य अविरतपणे सुरूच आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत असलेल्या वृद्धाश्रमांत जाऊन ही संस्था तेथील वृद्धांसोबत दिवाळी साजरी करते.
दिवाळी आपण घरच्यांबरोबर साजरी करतो. परंतु, वृद्धांसोबत ती साजरी करण्यात काही औरच आहे. केवळ दिवाळी त्यांच्यासोबत सेलिब्रेट करणे एवढाच यामागचा उद्देश नसून तेथील वृद्धांच्या व्यथा जाणून घेणे, त्यांना काही क्षण का होईना, थोडा आधार देणे, त्यांच्याबरोबर विविध स्वरूपांचे खेळ खेळणे, फराळाबरोबर काही भेटवस्तू देणे, अशा पद्धतीने आम्ही कित्येक वर्षे दिवाळी साजरी करत असल्याची भावना फाउंडेशनचे पदाधिकारी सुरेश माने यांनी व्यक्त केली.
अशी दिवाळी साजरी करण्यासाठी कोणाकडूनही वर्गणी अथवा रक्कम गोळा न करता फाउंडेशनचे पदाधिकारी आपापल्या परीने मदत करतात. त्याचाही वेगळाच आनंद पदाधिकाऱ्यांनासुद्धा मिळतो. सध्या फाउंडेशनमध्ये आठ पदाधिकारी असून ३५ च्या आसपास सभासद आहेत. परंतु, प्रत्येक जण काहीना काही मदत करीत असतोच. त्यामुळेच आम्ही हे शिवधनुष्य पेलू शकलो आहोत, असेही माने सांगतात.

अनाथाश्रमात होळी
केवळ दिवाळी सणच नाही, तर मुलांच्या अनाथाश्रमातही होळीचा सण साजरा करण्याचे काम या फाउंडेशनतर्फे सुरू आहे. मागील वर्षी येथील येऊरच्या आश्रमात मुलांबरोबर होळी साजरी करताना त्यांना खाद्यपदार्थ देणे, होळीची मजा लुटणे आदी उपक्रम पार पडले.

 

Web Title: Bloom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.