शॉकींग! घरातून ब्ल्यूटुथचा हेडफोन नेला, १७ वर्षांच्या मुलाला विवस्त्र फिरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 08:08 AM2023-11-23T08:08:22+5:302023-11-23T08:09:54+5:30

व्हिडीओ व्हायरल : कळवा पोलिसांनी एकाच्या आवळल्या मुसक्या

Bluetooth headphones taken from home, 17-year-old boy undressed | शॉकींग! घरातून ब्ल्यूटुथचा हेडफोन नेला, १७ वर्षांच्या मुलाला विवस्त्र फिरवले

शॉकींग! घरातून ब्ल्यूटुथचा हेडफोन नेला, १७ वर्षांच्या मुलाला विवस्त्र फिरवले

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : हातउसने घेतलेले तीनशे रुपये परत देण्यासाठी तसेच घरातील ब्ल्यूटुथ हेडफोन घेऊन गेल्याच्या कारणाने १७ वर्षीय मुलाला कपडे काढून गंभीर मारहाण करण्यात आली. एवढ्यावर न थांबता त्याला कळव्यातील  बाजारपेठेत फिरवल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे उघड झाला आहे. 

या प्रकरणी जखमी युवकाने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या  तौसिफ खानबंदे याच्या मुसक्या आवळल्या असून त्याचा मित्र सामिल खानबंदे हा पसार झाल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.  कळवा येथे राहणारा जखमी युवक ज्या सोसायटीत राहतो, तेथे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास तौसिफ आणि त्याचा मित्र सामील खानबंदे हे दोघे आले. त्यावेळी तौसिफ याने जखमी मुलाला तू  माझ्या  घरी येऊन ब्लूटूथ हेडफोन घेऊन का गेलास, अशी विचारणा करीत शिवीगाळ केली. याचदरम्यान तौसिफ याने पीडित मुलाने घेतलेले हातउसने तीनशे रुपयांचीही मागणी केली. त्याने  पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून तौसिफ याने अणकुचीदार हत्याराने या पीडित मुलाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली हल्ला केला. मला आताच पैसे पाहिजेत नाहीतर तुला सोडणार नाही, अशीही दमबाजी त्याने केली. तसेच त्याचा मित्र सामील यानेही पीडित मुलाला  हाताच्या चापटीने मारहाण केली. त्यानंतर तौसिफ याने युवकाच्या पॅन्टचा बेल्ट काढून त्याच बेल्टने त्याच्या पाठीवर मारहाण केली. 

फरार आरोपीचा शोध सुरू 
पीडित मुलाने केलेल्या तक्रारीनंतर कळवा बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या तौसिफ याला सकाळी राहत्या घरातून अटक केली. मात्र, त्याचा मित्र पसार झाला असून पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत. 

पैशांच्या वादातून हा प्रकार घडला. यामध्ये अल्पवयीन मुलाला मारहाण झाली आहे. मारहाण आणि व्हिडीओ बनवणारे अल्पवयीन नाहीत. या प्रकरणी एकाला अटक, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
 - कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळवा पोलिस ठाणे

Web Title: Bluetooth headphones taken from home, 17-year-old boy undressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.