शिक्षण मंडळ पुन्हा स्वगृही, वूडलँड इमारतीत होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 03:24 AM2017-09-20T03:24:24+5:302017-09-20T03:24:26+5:30

महापालिका मुख्यालयात अपुरे जागेचे कारण देत आयुक्तांनी शिक्षण मंडळ कार्यालय पुन्हा वूडलँड येथे स्थलांतरीत केले. मंडळाचे कार्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट घातल्याची बातमी १७ सप्टेंबरला ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाली होती.

The Board of Education will be resettled in the renovated, Woodland buildings again | शिक्षण मंडळ पुन्हा स्वगृही, वूडलँड इमारतीत होणार स्थलांतर

शिक्षण मंडळ पुन्हा स्वगृही, वूडलँड इमारतीत होणार स्थलांतर

Next

उल्हासनगर : महापालिका मुख्यालयात अपुरे जागेचे कारण देत आयुक्तांनी शिक्षण मंडळ कार्यालय पुन्हा वूडलँड येथे स्थलांतरीत केले. मंडळाचे कार्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट घातल्याची बातमी १७ सप्टेंबरला ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाली होती. कार्यालय स्थालांतरीत केल्याने पुन्हा मंडळ वादात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंंडळा अंतर्गत मराठी, हिंदी, गुजराथी व सिंधी माध्यमाच्या २८ शाळा आहेत. त्यापैकी दोन शाळा विद्यार्थ्यांच्या संख्याअभावी बंद केल्या. तत्कालिन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे असंख्य तक्रारी शिक्षण मंडळाच्या गेल्यावर त्यांनी संबंधित अधिकाºयांकडून माहिती मागवली. शिक्षण मंडळाची माहिती मिळाल्यावर त्यांना धक्का बसला. मंडळाचे कार्यालय वूडलँड व्यापारी इमारतीत असून महिला कर्मचाºयासोबत अश्लील कृत्य झाले आहे. याप्रकरणी तत्कालिन दोन प्रशासन अधिकाºयांसह इतर कर्मचाºयांवर गुन्हे दाखल आहेत. तसेच इमारतीच्या तळमजल्यावर लाकडाचे दुकान असून त्यामध्ये काम करणारे कामगार अर्धनग्न अवस्थेत राहतात.
महापालिका शाळेसह अनुदानित व विनाअनुदानित एकूण १८६ शाळेचे शिक्षक व शिक्षिका कामानिमित्त कार्यालयात येतात. कार्यालय मुख्यालयातून वूडलँड सारख्या व्यापारी इमारतीत स्थलांतरीत केल्याने टीका होत
आहे. यापूर्वी तत्कालिन महापौर अपेक्षा पाटील व उपमहापौर पंचशिला पवार यांनी मंडळाचे कार्यालय पालिका मुख्यालयात हलवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र राजकीय हस्तक्षेप व इतर नगरसेवकांची साथ मिळाली
नाही. दरम्यांन, तत्कालिन आयुक्त शिंदे यांनी शिक्षकांच्या बदल्या करून कार्यालय पालिका मुख्यालयात आणले. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे पुन्हा कार्यालय हलवण्याचा घाट घातला गेला.
>पुन्हा गैरव्यहाराला होणार सुरूवात
गेल्यावर्षी पालिका शाळेमध्ये ८ हजार विद्यार्थी दाखवून, शैक्षणिक साहित्यासह चिकी व इतर साहित्याची खरेदी केली. यामध्ये संबंधित अधिकारी, कंत्राटदार व राजकीय नेते मालामाल झाल्याची टीका झाली. विद्यार्थी सर्वेक्षणानंतर एका वर्षात तब्बल २ हजार विद्यार्थी कमी झाले असून सद्यस्थितीत ६ हजार विद्यार्थी दाखवण्यात आले. प्रत्यक्षात यापेक्षाही कमी विद्यार्थी शाळेत असल्याचे बोलले जात आहे. विविध घोटाळयांनी मंडळ गाजले असून पुन्हा शिक्षण मंडळात गैरव्यवहार होणार अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

Web Title: The Board of Education will be resettled in the renovated, Woodland buildings again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.