बोटीवरील नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 10:16 PM2017-10-15T22:16:30+5:302017-10-15T22:17:13+5:30

बोटीवरील नोकरीच्या आमिषाने गिरीश किरकिडे (५३, रा. देसाईगाव, डोंबिवली) यांच्याकडून साडेतीन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणा-या पाच जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Boat job bait gives fraud of three and a half lakhs | बोटीवरील नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

बोटीवरील नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

Next

ठाणे : बोटीवरील नोकरीच्या आमिषाने गिरीश किरकिडे (५३, रा. देसाईगाव, डोंबिवली) यांच्याकडून साडेतीन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणा-या पाच जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्यामुळे कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

किरकिडे यांनी त्यांचा मुलाला मरीन इंजिनीअरिंग शिक्षण झाल्यानंतर पुढील पदवीच्या शिक्षणासाठी बोटीवर पाठवण्यासाठी पश्चिम बंगाल येथील एका कंपनीशी संपर्क साधला. तेव्हा या कंपनीच्या संचालकांनी ठाण्यातील त्यांच्या कार्यालयात त्यांना संपर्क साधण्यास सांगितले. कंपनीचे ठाण्यातील लायझनिंग आॅफिसर कॅप्टन सुप्रियो मुखर्जी, ठाण्याचे संचालक सौमी मुखर्जी तसेच नवीन शर्मा आणि ग्यासुद्दीन ऊर्फ अतिफ खान यांनी आपसात संगनमत करून गिरीशला बोटीवर

पाठवण्यासाठी साडेतीन लाखांची रक्कम घेतली. मात्र, ही रक्कम न देता त्यांनी त्याला शिवीगाळ करून दमदाटीही केली. १ सप्टेंबर २०१६ ते १४ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत घडलेल्या या प्रकाराचा किरकिडे यांनी अखेर कासारवडवली पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title: Boat job bait gives fraud of three and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा