महाराष्ट्र शासनाकडून बोधी फाऊंडेशनचा सत्कार; सन्मानचिन्हे प्रमाणपत्र व २५ हजाराचा धनादेश

By सदानंद नाईक | Published: March 19, 2024 08:52 PM2024-03-19T20:52:49+5:302024-03-19T20:53:20+5:30

प्रधान सचिव सुमितकुमार भांगे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला आहे. 

Bodhi Foundation felicitated by Government of Maharashtra | महाराष्ट्र शासनाकडून बोधी फाऊंडेशनचा सत्कार; सन्मानचिन्हे प्रमाणपत्र व २५ हजाराचा धनादेश

महाराष्ट्र शासनाकडून बोधी फाऊंडेशनचा सत्कार; सन्मानचिन्हे प्रमाणपत्र व २५ हजाराचा धनादेश

उल्हासनगर : शासनाच्या समाजकल्याण व विशेष सहाय्यक विभागाने बोधी फाऊंडेशनच्या कार्याची दखल घेऊन सन्मानचिन्हे, प्रमाणपत्र व २५ हजाराचा धनादेश देऊन सत्कार केला. फाऊंडेशनचे डॉ ललित खोब्रागडे व अर्चना खोब्रागडे यांनी विभागाचे प्रधान सचिव सुमितकुमार भांगे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला आहे. 

महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात बोधी फौंडेशन संस्था सन-२००६ पासून कार्यरत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्य नागरिकांत पोहचविण्याचे काम संस्था करीत आहे. डॉ आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाने बोधी फौंडेशन निर्मित राजगृहाचे निळी स्पंदने हा १२५ कलावंताचा म्युजिकल शो केला. शो मध्ये १२५ कलावंत सहभागी झाले होते. तर सन-२०१८ मध्ये सतत ६४ तास गायन संस्थे तर्फे कलावंतांनी करून ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले. याशिवाय कला, क्रीडा स्पर्धा आदी विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबविले जात असल्याची माहिती डॉ ललित खोब्रागडे यांनी दिली. खोब्रागडे उल्हासनगर महापालिकेत सहायक संचालक नगररचनाकार या पदावर कार्यरत आहेत.

 महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमितकुमार भांगे यांच्या हस्ते बोधी फौंडेशनला मिळणारा सत्कार डॉ ललित खोब्रागडे व अर्चना खोब्रागडे यांनी १२ मार्च रोजी मुंबईला स्वीकारल्याची माहिती खोब्रागडे यांनी दिली. सन्मान चिन्हे, प्रमाणपत्र व २५ हजाराचा धनादेश सत्कार मध्ये होता. बोधी फौंडेशनच्या विविध उपक्रमाचे राज्य शासनाने दखल घेतली असून देशात संस्थेची चर्चा होत असल्याचेही खोब्रागडे म्हणाले आहे.

Web Title: Bodhi Foundation felicitated by Government of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.