बुडालेल्या दोघांचेही मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:20+5:302021-07-02T04:27:20+5:30
भिवंडी : मित्रांसोबत खदाणीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील पोगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली ...
भिवंडी : मित्रांसोबत खदाणीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील पोगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली होती. अग्निशमन दलाच्या पथकाकडून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होता मात्र अंधार पडल्याने शोध पथकाला शोधकार्य थांबवावे लागले होते. गुरुवारी अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. पुढील कार्यवाहीसाठी तालुका पोलिसांकडे हे दोन्ही मृतदेह सोपविण्यात आले असून शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
मोहम्मद यासिम मोहम्मद इस्लाम शेख ( १५) व मोहम्मद इम्रान वकील अहमद खान ( १८) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. ते सायंकाळी मित्रांसोबत मस्करपाडा पोगाव येथील येथे असलेल्या एका खदाणीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र यासीम व इम्रान या दोघांनी पाण्यात उडी घेतली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.