खडवलीच्या भातसा नदीत बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 08:09 PM2019-11-22T20:09:44+5:302019-11-22T20:09:48+5:30
मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा मार्गावर असलेल्या खडवली रेल्वे स्थानका नजीकच्या भातसा नदीवर पिकनिक पाॅईंटवर पिकनिक करण्यासाठी मुंबई वरून आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली होती.
टिटवाळा: मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा मार्गावर असलेल्या खडवली रेल्वे स्थानका नजीकच्या भातसा नदीवर पिकनिक पाॅईंटवर पिकनिक करण्यासाठी मुंबई वरून आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली होती. यातील बुडालेल्या युवकांचे मृतदेह शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी हाती लागले आहेत.
मुंबईतील वडाळा परिसरातील राहणारे आणि मुंबई येथील आय .टी.आय . कॉलेजचे विद्यार्थी असलेल्या मित्रांचा गुप्र खडवली येथील भातसा नदीच्या ठिकाणी गुरुवारी दुपारी पिकनिकसाठी आले होते. यावेळी दीड वाजण्याच्या सुमारास ते भातसा नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता दोन तरुणांना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. गुरुवारी दिवसभर आणि संध्याकाळी शोध घेऊनही त्यांचे मृतदेह हाती लागले नव्हते.
मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा त्यांचा स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि त्यांना सहकार्य करणारे बॉर्डर सेक्युरिटी सर्विसची टीम यांच्या मदतीने शोध घेत असताना सकाळी ११:३० च्या दरम्यान कुष्णा उर्फ श्रीधर धरणे (१९ ) याचा मृतदेह हाती लागला तर अक्षय गोकुळ भरमे वय २१वर्षे याचा मृतदेह सायंकाळी ४: ३० च्या दरम्यान सापडला आहे. हे मृतदेह शोधण्याकामी गोताखोर स्थानिक युवक गोरख वाघे यांनी अथक परिश्रम घेत हे मृतदेह शोधून काढले. सदर मृतदेह उल्हासनगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.