ठाण्यात १२ व्या मजल्यावरुन उडी घेऊन शरीरसौष्टव पटूची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 08:54 PM2019-11-29T20:54:29+5:302019-11-29T21:02:45+5:30

घोडबंदर रोडवरील रोझा बेला या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन विनय प्रमोद गुरव (४०) या बॉडी बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नसल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

 Body builder suicide by jumping from the 12th floor in Thane | ठाण्यात १२ व्या मजल्यावरुन उडी घेऊन शरीरसौष्टव पटूची आत्महत्या

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआत्महत्येचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बांधकामाच्या ठिकाणी फ्लोरिंगची कामे करणारा विनय प्रमोद गुरव (४०) या बॉडीबिल्डरने (हौशी शरीर सौष्ठवपटू) घोडबंदर रोडवरील रोझा बेला या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नसल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
कासारवडवली भागातील ‘श्री सृष्टी’ या इमारतीमध्ये राहणारे गुरव यांना फ्लोरिंगच्या कामाबरोबरच शरीर सौष्ठवचाही छंद होता. त्यामुळे ते याच ‘रोझा बेला’ इमारतीमधील बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेकडे डायट फूड घेण्यासाठी येत होते. तिच्याच सल्ल्याने ते आपला नियमित आहारही घेत होते. त्यामुळेच ते २९ नोव्हेंबर रोजीही दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या महिलेकडे आले होते. तिच्याकडून आपला ठरलेला आहार घेतल्यानंतर ते बाहेर पडले. त्यानंतर काही काळ फोनवर लॉबीमध्ये बोलत त्यानी फेºयाही मारल्या. मात्र, त्यानंतर अवघ्या काही वेळातच या बाराव्या मजल्यावरून स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असली तरी सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  Body builder suicide by jumping from the 12th floor in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.