कल्याणमधील बेपत्ता महिलेचा मृतदेह मुंबईच्या रेल्वेमार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 08:36 PM2018-01-18T20:36:39+5:302018-01-18T20:38:53+5:30
कल्याण येथील पुर्वेकडील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह मुंबईतील कांजूरमार्ग -नाहूर दरम्यान गुरु वारी सकाळी रेल्वे रूळालगत आढळून आला. नम्रता विरबहादूर पटेल असे या महिलेचे नाव आहे.
कल्याण - येथील पुर्वेकडील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह मुंबईतील कांजूरमार्ग -नाहूर दरम्यान गुरु वारी सकाळी रेल्वे रूळालगत आढळून आला. नम्रता विरबहादूर पटेल असे या महिलेचे नाव आहे.
कल्याण पूर्वेत चिंचपाडा परिसरातील बालाजी धाम बिल्डींगमध्ये राहणारे विरबहादूर केलाप्रसाद पटेल हे चालक असून कल्याण-डोंबिवली परिसरात थ्री व्हीलर टेम्पो चालवून आपल्या कुटुंबीयांचा उदरिनर्वाह चालवितात. पत्नी नम्रता आणी विरबहादूर यांना अंश नावाचा 5 वर्षांचा मुलगा आहे. विरबहादूर हे मंगळवारी सकाळी ११ वाजता टेम्पो घेऊन कामासाठी बाहेर गेले. रात्री एकच्या सुमारास त्यांना शेजारी राहणा-यांनी फोन करून घरात पत्नी नसून तुमची मूल रडत असल्याचे सांगितले. पत्नी नम्रता ही आजारी असल्याने डॉक्टरकडे गेली असावी, असे विरबहादूर यांना वाटले. म्हणून ते डॉक्टरकडे चौकशीसाठी गेले. मात्न तेथेही ती आली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्वत्र शोध घेतल्यानंतर विरबहादूर यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. मात्न ते राहत असलेल्या पत्त्यानुसार ही तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. एका महिलेचा मृतदेह मुंबईतील कांजूरमार्ग ते नाहूर स्थानकांदरम्यान रूळाच्या कडेला आढळून आला. चौकशीदरम्यान विरबहादूर यांनी हा मृतदेह आपली पत्नी नम्रता हिचा असल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी तपास सुरू असून नंतरच नम्रताचा मृत्यू कशामुळे ओढावला की तीची हत्या झाली? हे स्पष्टपणो सांगता येईल असे तपास अधिकारी कोळसेवाडीचे पोलिस हवालदार वळवी यांनी सांगितले.