हरवलेल्या मुलाचा मृतदेह आढळला; मुब्र्यातील घटना
By कुमार बडदे | Updated: June 8, 2024 23:49 IST2024-06-08T23:48:49+5:302024-06-08T23:49:13+5:30
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघड होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त उत्तम कोलेकर यांनी दिली

हरवलेल्या मुलाचा मृतदेह आढळला; मुब्र्यातील घटना
मुंब्राः दोन दिवसापूर्वी हरवलेल्या मुलाचा मृतदेह डोगरावरील जंगलात शनिवारी रात्री छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आला.मुंब्र्यातील कौसा भागातील रशिद कंपाउंड परीसरातील रेहान बाग येथे रहाणारा मेहताब मंसुरी हा १४ वर्षाचा मुलगा गुरुवार पासून हरवला होता.तो हरवला असल्याची तक्रार शुक्रवारी रात्री त्याच्या पालकांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल केली होती.त्याचा शोध सुरु असताना त्याचा मृतदेह आंबेडकर पाडा येथील डोगरामध्ये आढळून आला असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या त्याच्या भावाने मृतदेह त्याचाच असल्याची ग्वाही दिली.घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघड होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त उत्तम कोलेकर यांनी दिली. दरम्यान जेथे मेहताब याचा मृतदेह आढळून आला.त्या परीसरात मागील काही दिवसांमध्ये तीन ते चार जणांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती सूत्रानी दिली.