ठाणे खाडीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:34+5:302021-08-21T04:45:34+5:30
ठाणे : मुंब्य्रापासून जवळच असलेल्या रेतीबंदर खाडीत एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी आढळला. ठाणे ...
ठाणे : मुंब्य्रापासून जवळच असलेल्या रेतीबंदर खाडीत एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी आढळला. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तो पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटविण्याचे तसेच नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंब्रा, रेतीबंदर, गणेश विसर्जन घाटाजवळील खाडी किनारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती याच भागातील स्थानिक रहिवाशांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास दिली. तिच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी तो कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याचे नाव तसेच इतर कोणतीही माहिती अद्याप समजू शकली नसून त्याच्या नातेवाइकांचाही शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, कळवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून त्याच्या मृत्यूचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी सांगितले.