मुंब्र्यातील खाडीत मृतदेह आढळला
By कुमार बडदे | Published: May 24, 2024 09:56 AM2024-05-24T09:56:45+5:302024-05-24T09:57:20+5:30
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राःयेथील खाडीमध्ये शुक्रवारी सकाळी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
मुंब्रा शहरातील रेतीबंदर परीसरातील खाडी जवळील आत्माराम विसर्जन घाटा जवळ शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अंदाजित ४० ते ४५ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पोलिस कर्मचारी शंकर वायकर यांनी याबाबतची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली.माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक मच्छिमाराच्या मदतीने मृतदेह खाडी बाहेर काढून तो पोलिसांच्या ताब्यात दिला.
पोलिसांनी कायदेशीर कार्यवाहीची पूर्तता करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.आढळून आलेला मृतदेह कुणाचा होता याचा तपास पोलिस करत आहेत.