शरीरसौष्ठवाचा मानकरी त्रिपाठी

By admin | Published: February 21, 2017 05:39 AM2017-02-21T05:39:01+5:302017-02-21T05:39:01+5:30

मीरा-भार्इंदर महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री समर्थ जिमचा शिवआसरे त्रिपाठी मानकरी ठरला. क्रिकेटमध्ये

Bodybuilder Tripathi | शरीरसौष्ठवाचा मानकरी त्रिपाठी

शरीरसौष्ठवाचा मानकरी त्रिपाठी

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री समर्थ जिमचा शिवआसरे त्रिपाठी मानकरी ठरला. क्रिकेटमध्ये पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार संघाने पालिकेच्या कंत्राटी परिवहन संघाला पराभूत करुन विजय संपादन केला.
या स्पर्धेची सांगता शनिवारी झाली. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष होते. स्पर्धा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत्या. स्पर्धेच्या सुरुवातीलाच सूर्यकुंभाचे आयोजन करुन त्याची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न झाला. नंतर इतर स्पर्धांना सुरुवात झाली. लंगडी, धावणे, रिले, फुटबॉल, कॅरम, थाळी व गोळाफेक, कुस्ती, कबड्डी, खो-खो. क्रिकेट यांचा त्यात समावेश होता. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक व समूह नृत्य, चित्रकला आदी स्पर्धांचाही समावेश होता. शालेय विद्यार्थ्यांसोबत यंदा प्रथमच ज्येष्ठ नागरिक व महिलांना संधी देण्यात आली.
शरीरसौष्ठव स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात साई अ‍ॅक्टिव्हचा शशिकांत गुडे, ६० किलो वजनी गटात गोल्ड कॉईनचा अंकुर निजाई, ६५ किलो वजनी गटात श्री समर्थ जिमचा शिवआसरे त्रिपाठी, ७० किलो वजनी गटात फिनिक्स जिमचा विनायक लोखंडे, ७५ किलो वजनी गटात पावर झोनचा प्रेम राठोड, ८० किलो वजनी गटात साई अक्टिव्हचा संदेश मोहिते, ८५ किलो वजनी गटात पॉवर नाईनच्या आशिष पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. यातील शिवआसरे त्रिपाठीने महापौर चषकाच्या अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकाविले. बेस्ट पोझरसाठी पार पडलेल्या अंतिम फेरीत विनायक लोखंडे सरस ठरला.
क्रिकेटमध्ये पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार संघाने दमदार खेळी करुन महापौर चषक खेचून आणला. पालिकेच्या कंत्राटी परिवहन सेवेच्या संघाला ९ धावांनी पराभूत केले. विजेत्यांना महापौर जैन यांच्या हस्ते गौरविले. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम व पदके प्रदान केली. यावेळी विजेत्यांना व्यक्तिगत रोख रकमांची पारितोषिके प्रदान करणारी ही एकमेव मनपा असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Bodybuilder Tripathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.