बोगस डॉक्टर मोकाटच!

By admin | Published: January 26, 2016 01:54 AM2016-01-26T01:54:27+5:302016-01-26T01:54:27+5:30

वसई विरार महापालिका हद्दीत ५२ बोगस डॉक्टरांची यादी तार करण्यात आली. तनंतर आयुक्तांनी सदरच डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल

Bogas doctor Mokatch! | बोगस डॉक्टर मोकाटच!

बोगस डॉक्टर मोकाटच!

Next

शशी करपे,  वसई
वसई विरार महापालिका हद्दीत ५२ बोगस डॉक्टरांची यादी तार करण्यात आली. तनंतर आयुक्तांनी सदरच डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा, असे आदेश
देऊन एक महिला उलटला
तरी वैद्यकीय अधिकारी विविध
सबबी पुढे करीत बोगस डॉक्टरांवर कारवाई करीत नसलचे उजेडात आले आहे.
महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालिका हद्दीतील बोगस डॉक्टरविरोधात मोहिम उघडणचे आदेश वैद्यकीय अधिकारी डॉॅ. अनुपमा राणे यांना दिले होते. त्यानंतर डॉ. राणे यांनी आपल पथकामार्फत मोहिम राबवून ५२ बोगस डॉक्टरांची यादी आयुक्तांनी सादर केली. त्यानंतर आयुक्तांनी सर्व बोगस डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राणे यांना दिले. इतकेच नाही तर अप्पर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करणसाठी पोलिसांचे सहकार्य मागितले. मात्र, यादी तयार होऊन दीड महिला उलटला, आयुक्तांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन महिना उलटला तरी राणे यांनी ५१ बोगस डॉक्टरांवर कोणतीच कारवाई केली नाही.
सध्या वसई विरार परिसरात साथीच रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे पेशंटची रिघ लागलेली पहावास मिळते. पालिका हद्दीत आरोग्य खात्याच्या म्हणणानुसार ५१ बोगस डॉक्टर आहेत. पण, हा आकडी कितीतरी अधिक आहे. या डॉक्टरांवर कोणतीच कारवाई न झालने बोगस डॉक्टर सर्वसामानंच्या जीवाशी खेळ खेळत असलचे पहावास मिळते.
(प्रतिनिधी)

Web Title: Bogas doctor Mokatch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.