उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By admin | Published: May 1, 2017 06:04 AM2017-05-01T06:04:21+5:302017-05-01T06:04:21+5:30
शहाड फाटक येथे ओमकार आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. दुकानातील बनावट औषध विकणाऱ्या बोगस डॉक्टरसह दुकानादारावर
उल्हासनगर : शहाड फाटक येथे ओमकार आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. दुकानातील बनावट औषध विकणाऱ्या बोगस डॉक्टरसह दुकानादारावर उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहरातील झोपडपट्टी विभागात बोगस डॉक्टरांची दुकाने थाटली असून पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद टाले यांनी केला.
शहाड फाटक परिसरात ओमकार गिरी गोस्वामी यांचे ओमकार आयुर्वेदिक भंडाराचे दुकान आहे. दुकानात बसून डॉक्टरी करणारा मोहम्मद मसूद कादर बनावट औषधाची विक्री करीत होता. त्याच्याकडे पदवी नसल्याची पूर्ण कल्पना दुकानदार गोस्वामी याला होती. याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाल्यावर शुक्रवारी रात्री छापा टाकला. कारवाईत दुकानमालक गोस्वामी व डॉक्टरकी करणारा मोहम्मद यांच्याकडे पदवी नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली.
झोपडपट्टीत बोगस डॉक्टारांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांच्यासह विभागाला जाग येत नसल्याचा आरोप टाले यांनी केला. दरम्यान, डॉ रिजवानी यांच्याशी संपर्क साधला असता बोगस डॉक्टरची माहिती मिळाल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले. (प्रतिनिधी)