उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागात सापडला बोगस कर्मचारी

By सदानंद नाईक | Published: August 11, 2023 07:29 PM2023-08-11T19:29:59+5:302023-08-11T19:30:18+5:30

गोपनीयता भंग आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

Bogus employee found in Ulhasnagar Municipal Town Planning Department | उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागात सापडला बोगस कर्मचारी

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागात सापडला बोगस कर्मचारी

googlenewsNext

उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार विभागात काम करणाऱ्या जगन्नाथ जगताप या बोगस कर्मचाऱ्याला राष्ट्र कल्याण पार्टीचे शैलेश तिवारी यांनी पकडून मध्यवर्ती पोलीसांच्या ताब्यात दिले. याबाबत आयुक्त अजीज शेख यांनी मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना चौकशीचे आदेश दिले. विभागात एक नव्हेतर ६ बोगस कर्मचारी काम करीत असल्याने, विभागाच्या गोपनीयतेचा भंग होत नाही का? असा प्रश्न तिवारी यांनी केला.

उल्हासनगर महापालिकेतील नगररचनाकार विभागात महापालिकेच्या कोणत्याही परवानगी विना काही कर्मचारी काम करीत असल्याची चर्चा होती. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकारी वर्गाला असूनही त्याविरोधात कोणाची बोलायची हिंमत झाली नाही. 'तेरी भी चूप, मेरी भी चूप प्रमाणे नगररचनाकार विभागाचा कारभार चालला होता. दरम्यान महापालिका आर्थिक संकटात असतांना तत्कालीन सहाय्यक नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी विभागातून वर्षाला ५० कोटी पेक्षा जास्त उत्पन्न विभागात मिळून दिले होते. त्यावेळी विभागात कर्मचाऱ्याची संख्या कमी असल्याचे सांगून काही खाजगी कामगारांना कामाला ठेवल्याचे बोलले जात आहे. राष्ट्र कल्याण पार्टीचे शैलेश तिवारी व राहुल काटकर काही कामानिमित गुरवारी नगररचनाकार विभागात आले. त्यावेळी त्यांनी विभागात काम करणाऱ्या जगन्नाथ जगताप यांना आपण कोणत्या पदावर आहात? असा प्रश्न केला. त्यावेळी जगताप यांनी महापालिकेचा कर्मचारी नसून तत्कालीन नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी कामावर ठेवल्याचे सांगितले.

महापालिकेचा कायम अथवा कंत्राटी कर्मचारी नसतांना महापालिकेच्या कागदपत्रे का हाताळता?. असा प्रश्न तिवारी यांनी करून मध्यवर्ती पोलिसांना फोन केला. तसेच बोगस कर्मचारी जगताप यांना पकडून मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र महापालिकेने तक्रार दिलीतरच गुन्हा दाखल करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली. तर आयुक्त अजीज शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिका मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना चौकशीचे आदेश दिले. त्याबाबतची माहिती आयुक्तांनी पत्रकारांना दिली आहे.

 माजी उपमहापौराच्या पत्राला केराची टोपली 
माजी उपमहापौर विनोद तलरेजा यांनी नगररचनाकार विभागात जगरनाथ जगताप, राहुल जाते, विनोद खामितकर, किरण, मधुरा व मनिषा काम करतात का? अशी माहितीच्या अधिकाराखाली २८ जुलै रोजी माहिती मागितली होती. १० ऑगस्ट रोजी तलरेजा यांना कर्मचाऱ्याबाबत कोणतीही माहिती न देता अर्ज एकतर्फी निकालात काढला. मात्र त्याच दिवशी बोगस कर्मचाऱ्यांचे भिंग फुटले आहे.

Web Title: Bogus employee found in Ulhasnagar Municipal Town Planning Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.