लहानग्यांचे पुस्तक हा कौतुकास्पद उपक्रम
By Admin | Published: October 6, 2016 03:02 AM2016-10-06T03:02:20+5:302016-10-06T03:02:20+5:30
मराठी साहित्यात बाल-साहित्याची वानवा आहे. तसेच उपलब्ध बाल-साहित्य मोठ्यांनी लिहिले आहे. पण लहानांनी लहानांसाठी प्रथमच साहित्य लिहिल्याचे मी पाहत आहे
डोंबिवली : मराठी साहित्यात बाल-साहित्याची वानवा आहे. तसेच उपलब्ध बाल-साहित्य मोठ्यांनी लिहिले आहे. पण लहानांनी लहानांसाठी प्रथमच साहित्य लिहिल्याचे मी पाहत आहे. त्यांचे पुस्तक ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’तर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. हा अतिशय कौतुकस्पद उपक्रम आहे, असे मत नाट्यलेखक व दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी व्यक्त केले.
‘पै लायब्ररी’ने पाचव्या बाल वाचक महोत्सव घेतला. त्याअगोदर १८ सप्टेंबरला टिळकनगर शाळेत स्वरचित कथांवर स्पर्धा घेतली. त्यात डोंबिवलीतील ४७ शाळांमधून २६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा हिंदी, मराठी व इंग्रजी भाषांमध्ये झाली. या स्पर्धेसाठी चार गट होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच सर्वेश सभागृहात झाला. त्यावेळी म्हसवेकर बोलत होते. यावेळी संस्थेचे पुंडलिक पै उपस्थित होते.
यावेळी म्हसवेकर म्हणाले, की लहानपणापासून मुलांमध्ये वाचनाची आवड रुजवली जात आहे. भविष्यात त्यांना त्याचा फायदाच होईल. पालकांनी मुलांना या उपक्रमासाठी प्रोत्साहित केले, त्यासाठी त्यांचे कौतुक करायला हवे.
यावेळी दिलीप गुजर यांची संकल्पना व निर्मित असलेला ‘हसनावळ’ हा कार्यक्रम मुलांसाठी सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)
स्पर्धेचा निकाल :
१. गट पहिला : पहिली ते चौथी मराठी माध्यम. प्रथम क्रमांक मधुरा अटकेकर (टिळकनगर विद्यालय), द्वितीय क्रमांक समिका म्हडलेकर (स्वामी विवेकानंद विद्यालय),तृतीय क्रमांक गजेन साठे (स्वामी विवेकानंद विद्यालय),
२. गट पहिला : इंग्रजी माध्यम. प्रथम क्रमांक अनुश्री चौहान (स्टे. जोसेफ हायस्कूल),द्वितीय क्रमांक सोयना अरोझ (स्टे. जोसेफ ग्लोबल अकादमी), तृतीय क्र मांक अनुराधा श्रीकेशव (विद्यानिकेतन).
३. गट दुसरा : पाचवी ते सातवी मराठी माध्यम. प्रथम क्रमांक चैतन्य दोहेकर (लोकमान्य गुरुकुल स्कूल), द्वितीय क्रमांक दिकशा परब (टिळक नगर विद्यालय), सर्वेश निवेकर (स्वामी विवेकानंद विद्यालय).
४. गट दुसरा : इंग्रजी माध्यम : प्रथम क्रमांक अथर्व वैद्य (विद्यानिकेतन), द्वितीय क्रमांक अर्जुन प्रभू (साउथ इंडियन स्कूल), तृतीय क्रमांक आर्यन पै (विद्यानिकेतन)
५. गट दुसरा : हिंदी माध्यम : प्रथम क्रमांक आंचल चौरसिया (वैभव हिंदी स्कूल) द्वितीय क्रमांक यश मिश्रा (जेएसबी मंडळ स्कूल), तृतीय रूपम परिदा (जेएसबी मंडळ स्कूल).
६. गट तिसरा : आठवी ते दहावी मराठी माध्यम. वेदिका बुचके (टिळकनगर विद्यालय), द्वितीय क्रमांक नम्रता साखरे (साउथ इंडियन स्कूल), तृतीय क्रमांक शर्वरी बापट (टिळक नगर स्कूल).
७. गट तिसरा : इंग्रजी माध्यम. प्रथम क्रमांक संजना बैतुले (ओमकार इंटरनॅशनल स्कूल) द्वितीय क्रमांक विशाखा कोरडे (सिस्टर निवेदिता स्कूल), तृतीय क्रमांक कल्याणी देशपांडे (ग्रीन्स इंग्लीश स्कूल).
८. गट तिसरा : हिंदी माध्यम. प्रथम क्रमांक संगीता शेनॉय (मॉडेल इंग्लीश स्कूल)द्वितीय मनिषा चौहान (वैभव विद्यालय)तृतीय क्रमांक अश्विनी चौहान (वैभव विद्यालय).
९. गट चौथा : चार अकरावी आणि बारावी मराठी माध्यम. प्रथम क्रमांक विभा वझे (मुलुंड महाविद्यालय), द्वितीय क्रमांक बबिता परदेशी (टिळक नगर महाविद्यालय), तृतीय क्रमांक रेनुका हडपे (टिळकनगर महाविद्यालय) आदींनी पटकाविला.
१०. या स्पर्धेचे परीक्षण स्मिता तळेकर, मीना गोडखिंडी, सतीश चाफेकर, सचिन चौगळे आदींनी केले.