मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनला पहिल्यांदाच जोडण्यात आलेल्या विस्टाडोम कोचचे बुकिंग फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 03:19 PM2021-06-26T15:19:41+5:302021-06-26T15:20:09+5:30

प्रवाशांनी नदी, खोरे, धबधबे इत्यादी दृश्यांचा आनंद लुटला

Booking full for Vistadom coaches to Mumbai-Pune Deccan Express special train on Mumbai-Pune route for the first time | मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनला पहिल्यांदाच जोडण्यात आलेल्या विस्टाडोम कोचचे बुकिंग फुल्ल

मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनला पहिल्यांदाच जोडण्यात आलेल्या विस्टाडोम कोचचे बुकिंग फुल्ल

Next

डोंबिवली: एलएचबी कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेषची पहिली फेरी शनिवारी सुरू झाली.  विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटता आला. व्हिस्टाडोम कोचमधील सर्व ४४ सीटस बुक होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास सेल्फी लावलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रवाशांनी सेल्फी घेतली. या प्रसंगी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा केकही कापला.  

रेल्वेमंत्री पीयूष गोयल जी यांनी ट्वीटद्वारे म्हटले की, “मुंबई-पुणे मार्गावर, विषेश डेक्कन एक्स्प्रेसमध्ये पारदर्शक आणि मोठ्या खिडक्या असलेला व्हिस्टाडोम कोच प्रवासाचा आनंद वाढत आहे. यामध्ये प्रवास करणारे प्रवासी आपले सुखद अनुभव सांगत आहेत. प्रवाशांच्या जागतिक दर्जाच्या अनुभवासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे.

उमेश मिश्रा जे त्यांच्या पत्नी व मुलासमवेत प्रवास करीत होते त्यांनी फक्त परदेशात उपलब्ध असलेल्या  व्हिस्टाडोम कोच येथे सुरू केल्याबद्दल  रेल्वेमंत्री गोयल यांचे आभार मानले. मोठ्या खिडक्या आणि बदलानुकारी/हलु शकणा-या आसनांमुळे त्यांच्या मुलास या प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेता आला.

दुसर्‍या प्रवाशाने सांगितले की, तो मुंबई आणि पुणे दरम्यानचा नियमित प्रवासी असून व्हिस्टाडोम कोच जोडल्याने भोर घाटातील प्रवास अधिक आनंददायक होईल. प्रथमच व्हिस्टाडोममध्ये प्रवास करणार्‍या सायली म्हणाली की त्यांनी मोठ्या खिडकीच्या पॅनेलमधून या दृश्यांचा आनंद लुटला आणि पावसाळ्यातील हिरवळीमुळे हा आनंद द्विगुणित झाला. या मार्गावर हा कोच सुरू केल्याबद्दल त्यांनी  भारतीय रेल्वेचे आभार मानले. ठरलेल्या वेळेत ही रेल्वेगाडी पुण्यात पोहोचली.  

प्रवासी माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधारीजवळ), उल्हास नदी (जांबरूंगजवळ), उल्हास खोरे, खंडाळा, लोणावळा येथील भाग आणि  दक्षिण पश्चिम घाटावरील  धबधबे, बोगद्यांजवळून जाताना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकतील असा विश्वास रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला.

Web Title: Booking full for Vistadom coaches to Mumbai-Pune Deccan Express special train on Mumbai-Pune route for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.