उल्हासनगर महापालिका अभ्यासिकेला आयएएस झालेल्या अभिजित टाले यांच्याकडून पुस्तके

By सदानंद नाईक | Published: June 24, 2024 06:41 PM2024-06-24T18:41:12+5:302024-06-24T18:41:21+5:30

Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला नुकतेच आयएएस झालेले अभिषेक टाले यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील असंख्य पुस्तके अभ्यासिकेला भेट देऊन अभ्यासिकेतील मुलांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Books by Abhijit Tale who became an IAS at Ulhasnagar Municipal Corporation | उल्हासनगर महापालिका अभ्यासिकेला आयएएस झालेल्या अभिजित टाले यांच्याकडून पुस्तके

उल्हासनगर महापालिका अभ्यासिकेला आयएएस झालेल्या अभिजित टाले यांच्याकडून पुस्तके

- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला नुकतेच आयएएस झालेले अभिषेक टाले यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील असंख्य पुस्तके अभ्यासिकेला भेट देऊन अभ्यासिकेतील मुलांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 उल्हासनगर महापालिकेचे माजी नगरसेवक प्रमोद टाले यांचा मुलगा अभिषेक टाले यांची नुकतीच भारतीय प्रशासकीय सेवेत निवड (आयएएस) झालेली असून त्यांनी स्वतः अभ्यासलेली पुस्तके महापालिका डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला सोमवारी भेट दिली. ही पुस्तके अभ्यासिकेत स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करीत असलेल्या मुलांना उपयोगी ठरणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व उपायुक्त सुभाष जाधव यांनी महापालिकेच्या वतीने टाले यांनी भेट दिलेली पुस्तके स्विकारली आहे. अभिजित टाले यांचा यूपीएससी मधून निवड झाल्याबद्दल महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी महापालिकेच्या वतीने यापूर्वीच नागरी सत्कार केला होता.

Web Title: Books by Abhijit Tale who became an IAS at Ulhasnagar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.