...तर भिवंडीतील कामवारी नदी शेतीसाठी ठरेल वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:20 AM2018-06-18T03:20:13+5:302018-06-18T03:20:13+5:30

शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत आहे.

The boon for river Kavadi will be used for agriculture | ...तर भिवंडीतील कामवारी नदी शेतीसाठी ठरेल वरदान

...तर भिवंडीतील कामवारी नदी शेतीसाठी ठरेल वरदान

Next

- पंढरीनाथ कुंभार
शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत आहे. सरकारने तुम्ही जलस्रोत निर्माण करा असे सांगितल्यावर भ्रष्टाचाराने डोके वर काढले. यातून ज्यांना आर्थिक फायदा घ्यायचा होता तो घेतला. पण पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याहूनही नागरिकांची सोय झाली असती, मात्र त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरीकरणामुळे प्राथमिक सुविधांवर ताण येत असून त्या देताना यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अर्थात याला अन्य गोष्टीही जबाबदार आहेत. विशेषता पाण्यावरून भविष्यात वाद होऊ शकतात असे भाकित केले जात आहे. त्यामुळे जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण जे आहेत त्याचाही योग्य प्रकारे वापर करून नागरिकांना पाणी कसे देता येईल हेही पाहणे महत्वाचे आहे.
भिवंडी तालुक्यातील देपोलीच्या जंगलातून सुरू होणारा कामवारी नदीचा प्रवाह तसेच चावे व करंजावडे गावापासून छोट्या-मोठ्या नदीनाल्यातून वाहणारी कामवारी नदी ग्रामीण भागातून गोडे पाणी घेऊन शहराकडे येते. मात्र या प्रवाहाच्या मार्गावर नदीच्या पात्रातील गाळ न काढल्याने आणि पाणी साठवण्याच्या बंधाºयात वाढ न केल्याने शहराजवळ शेलार धरणावरून हे गोडे पाणी उलटून खाडीपात्रात जाते. त्यामुळे धरणांतून उलटणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पाटबंधारे व लघुपाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला पाहिजे.
तालुक्यातील खारपट्टीच्या जमिनीवर गोदामांची संख्या वाढत असताना जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यातच ग्रामीण भागात सरकारकडून होत असलेल्या विविध प्रकल्पात शेतकºयांच्या जमिनी जात असताना या प्रकल्पाजवळच्या जमिनीला मुंबईच्या व्यापाºयांनी लक्ष केले आहे. त्यामुळे शेतजमिनीला भाव आलेला आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाºया पाण्याच्या साठवणुकीकडे शेतकºयांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी हंगामी पिकासह भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारात राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतल्याने शेतीला दुय्यम स्थान मिळत आहे.
वास्तविक पावसाळ्यात देपोली येथील डोंगरातून येणाºया कामवारी नदीचा प्रवाह मोठा असतो .हा प्रवाह देपोली, साकरोली, नांदिठणे, लामज, म्हापोली,कोयना वसाहत पुढे चावे येथे जातो. तेथून पुढे बंधारे बांधले आहेत. परंतु चावे गावाच्या अगोदर बंधारे बांधल्यास दरम्यानच्या गावात पाण्याचा साठा निर्माण होईल व तेथील शेतकºयांना वर्षभर शेती उत्पादने घेण्यास मदत मिळू शकेल. मात्र हे बंधारे न बांधल्याने कामवारी नदीचे हजारो लिटर पाणी प्रत्येक पावसाळ्यात शेलारमधील धरणांवरून उलटून खाडीपात्रात जाते.
देपोली, चावे-भरे आणि करंजावडे या तीन वेगवेगळ्या नदीच्या प्रवाहातून शहराकडे येणारी कामवारी नदी पुंडास, निवळी, रोहिणी, सोनटक्का, कशीवली, विश्वभारती, सैनिक वसाहत, गोरसई, शेलार या गावातून धरणापर्यंत प्रवाहीत होते. या गावा दरम्यान नदीचा छोटा-मोठा प्रवाह असल्याने वहिवाटीसाठी गावाजवळ छोटेमोठे पूल बांधले आहेत. मात्र या पुलाखालून वाहणारे पाणी काही महिन्यातच आटून नदी पात्र ठणठणीत होते.
>प्रकल्पासाठी नेमलेली कंपनी बोगस
भिवंडी शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी चिंबीपाडा येथे धरण बांधण्याचा प्रकल्प मागील चाळीस वर्षापासून पालिकेच्या कार्यालयात धूळखात आहे. दरम्यान सरकारने महापालिकेला स्वत:चे पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यास सांगितले असता पालिकेने टेंभीवली-चिंबीपाडा येथील वारणा व कामवारी नदीवर मालकी करण्याच्या निमीत्ताने पाणीपुरवठा विभागामार्फत पीपीपी प्रकल्प राबवण्याचे षडयंत्र काही वर्षापूर्वी रचले. परंतु या प्रकल्पासाठी नेमलेली कंपनी बोगस निघाल्याने पालिकेचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होऊन या प्रकल्पात झालेल्या
भ्रष्ट कारभाराचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे या दोन्ही नदीतील पाणी
साठवणे दूरच राहिले परंतु दरवर्षी पावसाचे पाणी खाडीपात्रात जाते हे भिवंडीकरांचे दुर्दैव आहे.

Web Title: The boon for river Kavadi will be used for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.