बूस्टर डोस नियमानुसारच दिले जाणार, महापालिकेची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 07:04 PM2021-12-27T19:04:21+5:302021-12-27T19:05:46+5:30

बूस्टर डोस देण्यासंदर्भात ठाणे महापालिकेने केलेल्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी महापौर म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती

The booster dose will be given as per the rules, Thane mayor naresh maske told | बूस्टर डोस नियमानुसारच दिले जाणार, महापालिकेची तयारी सुरू

बूस्टर डोस नियमानुसारच दिले जाणार, महापालिकेची तयारी सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे महापालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील मुले, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांची एकूण संख्या लक्षात घेऊन त्या दृष्टीने लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे.

ठाणे - येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुले, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यानुसार ठाणो महापालिकेने याबाबतचे नियोजन केले असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे बुस्टर डोस दिले जाणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी दिली.

बूस्टर डोस देण्यासंदर्भात ठाणे महापालिकेने केलेल्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी महापौर म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीस स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, आरोग्य समिती सभापती निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मनिष जोशी आणि आरोग्य अधिकारी भीमराव जाधव आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील मुले, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांची एकूण संख्या लक्षात घेऊन त्या दृष्टीने लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. राज्य शासनाकडून बूस्टर डोस देण्यासंदर्भात नियमावली प्राप्त होताच शहरात लसीकरण सुरू केले जाईल, असेही महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले केले.

दरम्यान, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून ठाणो शहरात येणा:या नागरिकांची तपासणी सुरू आहे. परंतू काही नागरिक हे परदेशातून आल्याची माहिती लपवतात. काही दिवसानंतर असे परदेशी नागरिक बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून सोसायट्यांनीही अशा परदेशातून येणा:या नागरिकांची माहिती तात्काळ ठाणो महापालिकेस ८२८६४०५९९० या क्रमांकावर किंवा कोरोनासेलटीएमसी अॅट द रेट जीमेल डॉट कॉम या ई-मेलद्वारे कळविण्याचेही आवाहन केले आहे. आरटीपीसीआर चाचणी पॉङिाटिव्ह आल्यास अशा नागरिकांना शासन नियमाप्रमाणो विलगीकरण केंद्रात राहणे बंधनकारक राहील, जो पर्यत या नागरिकांचा ओमायक्र ॉनच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यत त्यांनी विलगीकरण केंद्रात  राहण्याचे आवाहनही महापौर म्हस्के यांनी केले आहे.

Web Title: The booster dose will be given as per the rules, Thane mayor naresh maske told

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.