ठाणे महापालिकेच्या तरण तलावांना आता दिले जाणार बोअरवेलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 03:53 PM2019-01-22T15:53:58+5:302019-01-22T15:55:39+5:30

ठाणे महापालिकेच्या चार तरण तलावांना यापुढे बोअरवेलचे पाणी देण्याचा विचार पाणी पुरवठा विभागाने सुरु केला आहे. त्यानुसार या संदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Borewell water to be given to Thane Municipal's swimming pools | ठाणे महापालिकेच्या तरण तलावांना आता दिले जाणार बोअरवेलचे पाणी

ठाणे महापालिकेच्या तरण तलावांना आता दिले जाणार बोअरवेलचे पाणी

Next
ठळक मुद्देसध्या दिले जातेय सहा लाख लीटर पाणीआरओ प्लान्टही उभारला जाणार

ठाणे - ठाणे महापालिकेच्या चार तरण तलावांना रोज सहा लाख लीटर पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची गंभीर नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली होती. त्यानंतर सर्व पक्षीयांनी यावर तोडगा काढण्याची मागणी केल्यानंतर आता पाणी पुरवठा विभागाने या तरण तलावांना बोअरवेलचे पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच या ठिकाणी आरओ प्लान्टसुध्दा विकसित केला जाणार असून बोअरवेलचे पाणी तरण तलावाबरोबरच पिण्यासाठी देण्याचा विचार सुरु झाला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
             मागील आठवड्यात शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी शहरातील महापालिकेच्या स्विमींग पुलांना कोणते पाणी वापरले जाते असा सवाल उपस्थित केला होता. त्यानुसार या तरण तलावांसाठी पिण्याचे पाणी दिले जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अर्जुन अहिरे यांनी दिली. या तरण तलावांसाठी रोज प्रत्येकी दिड लाख लीटर पाणी दिले जात असून चार तरण तलावांसाठी सहा लाख लीटर पाणी पुरविले जात आहे. एकीकडे शहरात सध्या पाणी कपातीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. आजच्या घडीला २२ टक्के पाणी कपात लागू आहे. त्यात काही वेळेस उंच ठिकाणावरील भागांना पाणी दोन दोन दिवसांच्या फरकाने येत आहे. असे असतांना तरण तलावांना पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याने यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
परंतु याची दखल आता पाणी पुरवठा विभागाने घेतली असून या तरण तलावांच्या ठिकाणी बोअरवेल विकसित करता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यानंतर प्रत्येक तरण तलावाच्या ठिकाणी खाजगी तरण तलावाप्रमाणेच बोअरवेल विकसित केली जाणार असून त्याचे पाणी यासाठी वापरले जाणार आहे. तसेच या ठिकाणी आरओ प्लान्टसुध्दा विकसित केला जाणार असून या बोअरवेलच्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी पिण्यायोग्य केले जाणार आहे. त्यानुसार याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम आता हाती घेण्यात आले असून, येत्या काही दिवसात हा अहवाल तयार होऊन तो मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.



 


 

Web Title: Borewell water to be given to Thane Municipal's swimming pools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.