नगरसेवकाच्या नावाने लाच
By admin | Published: May 4, 2017 05:37 AM2017-05-04T05:37:14+5:302017-05-04T05:37:14+5:30
वसई विरार महापालिकेच्या एका नगरसेवकाच्या नावाने दोन लाख रु पयांच्या लाचेची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस
विरार : वसई विरार महापालिकेच्या एका नगरसेवकाच्या नावाने दोन लाख रु पयांच्या लाचेची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत तक्र ार आल्यानंतर ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने या इमसाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याच्याशी नगरसेवकाचा थेट संबंध आढळून आलेला नाही.
तक्रारदार वसईतील बिल्डर असून त्यांनी इमारती मध्ये दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. या कामावर कारवाई करू नये यासाठी वसई विरार महापालिकेतील एका नगरसेवकाच्या नावाने आरोपी जितेंद्र वेंगुर्लेकर (४२) याने दोन लाख रु पयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील संभाषण ध्वनीमुद्रीत केल्यानंतर लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर बुधवारी वेंगुर्लेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. (वार्ताहर)
नगरसेवकाचा संबंध नाही
आता पर्यंतच्या तपासात तरी नगरसेवकाचा थेट सहभाग आढळून आला नाही. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दुबे यांनी सांगितले.