मांडुळांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:08 AM2018-03-20T02:08:18+5:302018-03-20T02:08:18+5:30
अंबरनाथ येथे मांडूळ जातीच्या दोन सापांची विक्र ी करण्यासाठी आलेल्या दोघांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी दोन्ही मांडूळ जप्त केले आहेत. या दोन्ही सापांची अंदाजे किंमत १२ लाख असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.
अंबरनाथ : अंबरनाथ येथे मांडूळ जातीच्या दोन सापांची विक्र ी करण्यासाठी आलेल्या दोघांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी दोन्ही मांडूळ जप्त केले आहेत. या दोन्ही सापांची अंदाजे किंमत १२ लाख असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.
अंबरनाथ येथील कल्याण-बदलापूर मार्गावर दोन व्यक्ती मांडूळ जातीच्या सापांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अहमद वुलन मिल येथे सापळा रचला. त्यावेळी तेथे विक्रीसाठी आलेले सुरेश भाऊलाल निकम (३५) (रा. चाळीसगाव) आणि संजय पवार (५०) (रा. पनवेल) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन मांडूळ आढळले. आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी हे मांडूळ विक्र ीसाठी आणल्याचे कबूल केले. अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षणअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या मांडूळ जातीच्या सापांना विदेशात मोठी मागणी असल्याने त्यांचा वापर औषधे बनवण्यासाठी होत असतो. मात्र, हे मांडूळ येथे नेमक्या कोणत्या कामासाठी आणले होते, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.