लाच स्वीकारताना दोघे गजाआड
By admin | Published: March 20, 2016 12:53 AM2016-03-20T00:53:35+5:302016-03-20T00:53:35+5:30
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत दिवाणमाळ, रायतापाडा या आदिवासी पाड्यांवरील सार्वजनिक विहिरींच्या बांधकामांची बिले मंजूर करण्यासाठी लाच घेताना ठाणे जिल्हा परिषदेच्या
अनगाव : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत दिवाणमाळ, रायतापाडा या आदिवासी पाड्यांवरील सार्वजनिक विहिरींच्या बांधकामांची बिले मंजूर करण्यासाठी लाच घेताना ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन पाटील, रिंगमन प्रशांत कन्नुल यांना अटक करण्यात आली. त्यांनी १० हजारांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी त्यांना अटक केली. याबाबत, पोटठेकेदार प्रफुल्ल शेलार यांनी तक्रार केली होती.
दिवाणमाळ, रायतापाडा येथील दोन विहिरींवर १४ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. विहिरींच्या बांधकामांचा ठेका घेणाऱ्या कंत्राटदाराकडून प्रफुल्ल शेलार यांनी कंत्राट घेऊन ते बांधकाम पूर्ण केले. अंतिम बिल मंजूर करण्यासाठी संबंधितांनी ३० हजारांची मागणी केली. दोघांमध्ये तडजोड होऊन १० हजार देण्याचे ठरले. त्यानंतर, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यावर त्यांनी सापळा रचला आणि त्यांना अटक केली.