मुरबाड आणि शहापूर दोन्ही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ७१.८३ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:57 AM2021-12-22T00:57:01+5:302021-12-22T00:58:18+5:30

मुरबाडमध्ये एकूण १७ पैकी १३ प्रभागांमध्ये निवडणूक झाली त्यासाठी १९ मतदान केंद्र होते. एकूण १२ हजार ८९७ पैकी ८९५१ मतदारांनी (६९.४ टक्के) मतदानाचा हक्क बजावला त्यात ७०.५२ टक्के महिला मतदारांनी तर ६८.४० टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले. 

In both Murbad and Shahapur Nagar Panchayat general elections, the turnout was 71.83 percent | मुरबाड आणि शहापूर दोन्ही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ७१.८३ टक्के मतदान

मुरबाड आणि शहापूर दोन्ही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ७१.८३ टक्के मतदान

googlenewsNext

ठाणे: जिल्ह्यात आज मुरबाड आणि शहापूर या दोन्ही नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ७१.८३ टक्के मतदान झाले. त्यामध्ये मुरबाड ६९.४ टक्के तर शहापूर मध्ये ७५.७३ टक्के मतदान झाले.

मुरबाडमध्ये एकूण १७ पैकी १३ प्रभागांमध्ये निवडणूक झाली त्यासाठी १९ मतदान केंद्र होते. एकूण १२ हजार ८९७ पैकी ८९५१ मतदारांनी (६९.४ टक्के) मतदानाचा हक्क बजावला त्यात ७०.५२ टक्के महिला मतदारांनी तर ६८.४० टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले. 

शहापूरमध्ये एकूण १७ पैकी १३ प्रभागांमध्ये निवडणूक झाली त्यासाठी १४ मतदान केंद्र होते. एकूण ८ हजार ५८ पैकी ६१०२ मतदारांनी (७५.७३ टक्के) मतदानाचा हक्क बजावला त्यात ७५.४४ टक्के महिला मतदारांनी तर ७५.९८ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले. 

Web Title: In both Murbad and Shahapur Nagar Panchayat general elections, the turnout was 71.83 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.