नोकरीच्या निमित्ताने दोघांची झाली ओळख; सरस्वतीच्या मृतदेहाची काढली छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 10:15 AM2023-06-10T10:15:23+5:302023-06-10T10:15:29+5:30
तेथेच दाेघांचे प्रेमसंबंध जुळले.
लाेकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड :मीरा रोडमध्ये हत्या झालेली सरस्वती ही अहमदनगरच्या आश्रमात असताना १० वीत नापास झाली हाेती. बोरिवली येथे २०१४ मध्ये ती नोकरीच्या शोधात आली हाेती. त्यावेळी सानेसोबत तिची ओळख झाली. त्याने दोन वर्षे तिला बोरिवलीच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. तेथेच दाेघांचे प्रेमसंबंध जुळले.
सरस्वतीची आवश्यक कागदपत्रे आणि तिला दहावीची परीक्षा पुन्हा द्यायची असल्याने ताे तिच्यासोबत अहमदनगरच्या आश्रमात जात होता. तेव्हा सरस्वती हिने साने हा वयाने खूपच मोठा असल्याने मामा असल्याचे सांगितले होते.
बोरिवलीच्या फ्लॅटचे त्याला ३० हजार रुपये भाडे येत होते. त्यातून ताे मीरा रोडच्या फ्लॅटचे १० हजार भाडे भरत होता, तसेच बाभई येथील रेशन दुकानात तो पार्टटाइम काम करायचा व तेथून त्याला पाच हजार रुपये पगार मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. २९ मेपासून तो दुकानावर गेला नव्हता.
४ जूनला त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. सरस्वतीच्या मृत्यूनंतर त्याने श्रद्धा वालकर हत्याकांडाचे व्हिडीओ, तसेच एक वेबसिरीज पाहिली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काय उपाय करायचे, हे त्याने गुगलवर सर्च केले होते. त्याने इलेक्ट्रिक करवतीने मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते कुकरमध्ये शिजवले. त्याआधी आठवण म्हणून सरस्वतीच्या मृतदेहाची छायाचित्रे त्याने काढली.