सिंचन घोटाळ््यातील दोघांना जामीन
By Admin | Published: November 25, 2015 03:25 AM2015-11-25T03:25:41+5:302015-11-25T03:25:41+5:30
पेण येथील बाळगंगा सिंचन गैरव्यवहाराप्रकरणी लाचलुचपत विभागाने ९० दिवस उलटून गेले तरीही आरोपपत्र दाखल न केल्याने कंत्राटदार एफ
ठाणे : पेण येथील बाळगंगा सिंचन गैरव्यवहाराप्रकरणी लाचलुचपत विभागाने ९० दिवस उलटून गेले तरीही आरोपपत्र दाखल न
केल्याने कंत्राटदार एफ. ए. एन्टरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री आणि तत्कालीन उपअभियंता राजेश रिठे यांना बुधवारी ठाणे
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश वी. वी. बांबर्डे यांनी जामीन मंजूर केला आहे.
कोपरी पोलीस ठाण्यात २५ आॅगस्ट रोजी याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे लाचलुचपत विभागाने निसार आणि रिठे यांना अटक केली. त्यानंतर ३ सप्टेंबर
रोजी तत्कालीन शाखा अभियंता विजय कासटसह एफ. ए. एंटरप्रायजेसचे भागीदार अबीद तसेच जाहीद या खत्री बंधूंना मुंबईतून अटक केली गेली. हे पाचही जण न्यायालीन कोठडीत होते.
गेल्या ९० दिवसात संबंधितांवर आरोपपत्र दाखल न झाल्याने निसार व रिठे या दोघांना जामीन मिळावा अशी मागणी त्यांच्या वकीलाने न्यायालयाकडे केली. त्यानुसार बुधवारी त्यांचा जामीन मंजूर झाला. न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)