प्लास्टर कोसळून राबोडीत दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:10 AM2018-12-01T00:10:57+5:302018-12-01T00:11:05+5:30

दीड महिन्यापूर्वीच राबोडी-२ येथील शिवाजीनगरमध्ये ओम सूर्या नावाची तळ अधिक तीन मजली इमारत खचल्याचा प्रकार घडल्याची घटना घडली

Both of them were injured in plaster collapse | प्लास्टर कोसळून राबोडीत दोघे जखमी

प्लास्टर कोसळून राबोडीत दोघे जखमी

Next

ठाणे : दीड महिन्यापूर्वीच राबोडी-२ येथील शिवाजीनगरमध्ये ओम सूर्या नावाची तळ अधिक तीन मजली इमारत खचल्याचा प्रकार घडल्याची घटना घडली असताना शुक्र वारी राबोडी-१ परिसरातदेखील अल्मुता नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्लास्टरसह सिलिंग कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दोनदोन जण जखमी झाले असून यापैकी एकाला माजिवडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. ज्या रूममध्ये ही घटना घडली आहे, त्या रूममधील कुटुंबाला बाहेर काढण्यात आले असून इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.


राबोडी-१ परिसरातील जुम्मा मशिदीच्या बाजूला अल्मुता ही १५ वर्षे जुनी इमारत आहे. शुक्र वारी सकाळी ११ च्या दरम्यान पहिल्या मजल्यावरील एका रूममधील प्लास्टर कोसळले. यामध्ये कुटुंबातील दोघेजण जखमी झाले आहेत. मोहम्मद हुसेन शेख (४६) असे एका जखमीचे नाव असून त्याला माजिवडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या जखमीचे नाव समजू शकले नाही. या इमारतीमध्ये एकूण १६ कुटुंबे वास्तव्यास असून या घटनेनंतर आता इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यानंतरच या इमारतीवर कारवाई करायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पालिका अधिकाºयांनी स्पष्ट केले.


दीड महिन्यापूर्वीच राबोडी-२ परिसरात इमारत खचल्याचा प्रकार घडला होता. खचलेली इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर तीवर कारवाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानंतर, आता ही दुसरी घटना घडली असून शहरात जुन्या असलेल्या इमारतींचा स्ट्रक्चरल आॅडिट करण्याकडे कल नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पालिकेने सूचना देऊनही फार कमी रहिवाशांनी स्ट्रक्चरल आॅडिट केले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Web Title: Both of them were injured in plaster collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.