उच्च दाबाची डिझेल वाहिनी लिकेज; मुंब्रा परिसरात खळबळ
By कुमार बडदे | Published: December 22, 2022 08:07 AM2022-12-22T08:07:34+5:302022-12-22T08:09:19+5:30
गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंब्रा शहराजवळील शिळ म्हापे रस्त्याजवळील भारत गँस गोडाऊन जवळ लिकेज झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुमार बडदे, मुंब्राः मुंबईहून मनमाडला डिझेल वाहून नेणारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बिपीसीएल) ची १८ इंच व्यासाची उच्चदाबाची डिझेल वाहिनी गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंब्रा शहराजवळील शिळ म्हापे रस्त्याजवळील भारत गँस गोडाऊन जवळ लिकेज झाली.यामुळे परीसरात काही काळ खळबळ उडाली होती.
याबाबतची माहिती मिळताच नवी मुंबईतील तुर्भे पोलिस ठाण्यातील पोलिस आणि शिळ अग्निशमन दलाचे जवान एक फायर इंजिनसह घटनास्थळी उपस्थित झाले असून,या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. बिपीसीएलच्या कर्मचा-यांनी मुंबई ते मनमाड दरम्यानची वाहिनी पूर्णतः बंद करुन दुरुस्तीचे काम सुरु केले असल्याची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"