वळवाच्या पावसाने तुटलेल्या झाडांच्या फांद्या ठाण्यात तशाच पडून, ठाणेकरांमध्ये संताप !
By सुरेश लोखंडे | Published: May 16, 2024 08:18 PM2024-05-16T20:18:56+5:302024-05-16T20:19:40+5:30
शहराचा महत्वाचा व कायम वर्दळीच्या नौपाडा परिसरात या फांद्या पडून असल्यामुळे ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे : अवकाळी वादळी पावसामुळे ठाणे शहरात ठिक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, झाडांच्या फांद्या मोडून पडल्या . पण या फाद्यांना ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलून त्यांची विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे शहराचा महत्वाचा व कायम वर्दळीच्या नौपाडा परिसरात या फांद्या पडून असल्यामुळे ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तश्या तक्रारीही महापालिका आयूक्तांकडे आँनलाईन करण्यात आल्या,असे ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी स्पष्ट केले.
शहरांत रस्तावर झाडांच्या फांद्यांचे ढीगच्या ढीग पडलेले आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेतच पण करदात्या नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे. काही ठिकाणी तर ह्या फांद्या पदपथावर पसरून ठेवलेल्या दिसत आहेत. या झाडांच्या फांद्या व अवशेष राम मारुती रोड, गोखले रोड तसेच विष्णूनगर परिसरातील अरुंद गल्लीबोळातील रस्त्यांवर दिसून येते आहेत.
चार दिवसांनी मतदान आहे, हे जाणून असून नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे म्हणून जनजागृतीहि करीत आहात. या ढिगार्यांमुळे नागरिकांमध्ये चिडचिड निर्माण होऊन शहराचा हैपीनेस इंडेक्स घसरत आहे ह्याची गांभीर्याने नोंद घ्यावी0, असे ही आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे