शाब्बास! लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा रेल्वे अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:08 PM2020-01-05T18:08:45+5:302020-01-05T18:10:38+5:30
ही घटना आज सकाळी ९.४५ ते १०.१५ दरम्यान घडली.
ठाणे - पाटणा एक्स्प्रेसच्या (ट्रेन क्रमांक - १३२०१) लोकोपायलटच्या प्रसंगावधानतेमुळे मध्य रेल्वेवरील खडवली - टिटवाळादरम्यान मोठा रेल्वे अपघात टळला आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लोकोपायलट एस. मुरुगन यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपत्कालीन (इमर्जन्सी) ब्रेक दाबून एक्स्प्रेस थांबवली. ही घटना आज सकाळी ९.४५ ते १०.१५ दरम्यान घडली. मात्र, मुरुगन यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, रेल्वे रुळाला तडा गेल्यानं विस्कळीत झालेली वाहतूक अर्ध्या तासानं पूर्ववत करण्यात आली.
मेगा ब्लॉकमुळे अगोदर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली असताना मध्य रेल्वेच्या खडवली-टिटवाळा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला होता. आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. कल्याणनजीक असलेल्या खडवली - टिटवाळ्यादरम्यान अप दिशेकडील रेल्वे रुळाला तडा गेल्यानं आज सकाळी ९.४५ ते १०.१५ वाजताच्या सुमारास लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.अर्ध्या तासानंतर रेल्वे प्रशासनानं दुरुस्ती केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, लोकोपायलट यांच्या हुशारीमुळे पाटणा एक्स्प्रेसमध्ये असलेल्या हजारो प्रवाशांचे जीव वाचले आणि मोठा अनर्थ टळला आहे.
Alert Loco Pilot done good job:
— Shivaji Sutar (@ShivajiIRTS) January 5, 2020
Rail Fracture between Khadvali-Titwala section @Central_Railway reported by Loco Pilot Mr S Murugan of train no 13201.
Time 9.45 to 10.15am.
LP applied emergency brake and stopped the train at rail fracture site. He will be awarded suitably. pic.twitter.com/nnkf9zLMKw