पावसाळा लांबल्याने पिकनिकला लागलाय ब्रेक

By admin | Published: June 20, 2017 06:29 AM2017-06-20T06:29:12+5:302017-06-20T06:29:12+5:30

जून महिना संपत आला, तरी पावसाने ठाणे, मुंबई परिसरांत दडी न मारल्याने तरुणाईच्या पावसाळी पिकनिकला ब्रेक लागला आहे.

A break from the monsoon delayed the picnic | पावसाळा लांबल्याने पिकनिकला लागलाय ब्रेक

पावसाळा लांबल्याने पिकनिकला लागलाय ब्रेक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जून महिना संपत आला, तरी पावसाने ठाणे, मुंबई परिसरांत दडी न मारल्याने तरुणाईच्या पावसाळी पिकनिकला ब्रेक लागला आहे. पिकनिकचे सर्व प्लानिंग झाले असले, तरी तिचा हिरो असलेल्या पावसाचा पत्ताच नसल्याने तरुणाईमध्ये नाराजीचा सूर आहे. आज, उद्या पाऊस पडेल, अशा विचारात असणारी तरुणाई पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करते आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी पिकनिक लांबणीवर पडल्या आहेत. तिसरा आठवडा उलटला तरी अद्याप पावसाने कृपादृष्टी न केल्याने सहलप्रेमींचे वीकेण्ड् कोरडे जात आहेत. यंदाही सहलप्रेमींचे पिकनिक प्लान्स पोस्टपोण्ड होत आहेत. सोशल मीडियापासून कट्ट्याकट्ट्यांवर पिकनिकच्या चर्चा रंगत असल्या, तरी पाऊस आल्यावर पिकनिकच्या तारखा ठरवू, असा सूर तरुणांच्या गटागटांतून ऐकायला मिळत आहे. पावसाळ्यात बहरलेला निसर्ग सहलप्रेमींना खुणावत असतो. त्यामुळे जून महिना सुरू झाला की, सहलप्रेमींच्या पिकनिक प्लान्सला उधाण येते. या दिवसांत सहलप्रेमींना खुणावतात ते धबधबे, ट्रेकिंग पॉइंट, रिसॉर्ट. कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. भंडारदरा, कोंडेश्वर, वदप, भुशी डॅम, भिवपुरी, पळसदरी, माथेरान, तुंगारेश्वर, राधा फॉल, पांडवकडा, झेनीथ, गाढेश्वर, फणसाड, आषाणे, थिदबीचा धबधबा, तर ट्रेकिंगसाठी गडकिल्ले अशा अनेक ठिकाणांची निवड सुरू होते. रिमझिम बरसलेल्या पावसामुळे ठाणे, मुंबईकरांची सुपरफास्ट ट्रॅकवर असलेली मान्सून पिकनिकची धावपळ तसेच, लोणावळा, खंडाळा, माळशेज घाटासारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरच जवळपासचे धबधबे शोधण्याची सुरू असलेली धावपळ थंडावली आहे. या आठवड्यात लाँग वीकेण्ड असल्याने लवकरच पाऊस यावा, अशी दृढ इच्छा व्यक्त केली जात आहे. या सर्वच ठिकाणी जाण्यासाठी सहलप्रेमी उत्सुक आहेत. परंतु, वरुणराजा काही बरसत नसल्यामुळे त्यांच्या प्लान्सला कात्री लागली आहे.

Web Title: A break from the monsoon delayed the picnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.