खडवली-टिटवाळादरम्यान रुळाला तडा; अर्धा तास खोळंबा, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:20 AM2020-01-10T04:20:19+5:302020-01-10T04:20:25+5:30

खडवली-टिटवाळा स्थानकांदरम्यान अपमार्गावर सकाळी ८.५० वाजता रेल्वेरुळाला तडा गेल्याने कसारा-कल्याण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

Break the Rule during the Khadavali-Titwala; Half an hour detour, commute | खडवली-टिटवाळादरम्यान रुळाला तडा; अर्धा तास खोळंबा, प्रवाशांचे हाल

खडवली-टिटवाळादरम्यान रुळाला तडा; अर्धा तास खोळंबा, प्रवाशांचे हाल

googlenewsNext

डोंबिवली / टिटवाळा : खडवली-टिटवाळा स्थानकांदरम्यान अपमार्गावर सकाळी ८.५० वाजता रेल्वेरुळाला तडा गेल्याने कसारा-कल्याण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने नोकरदारवर्गाचे हाल झाले. सकाळी ९.२० वाजता रूळदुरुस्तीनंतर वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
रुळाला तडा गेल्याची घटना एका लोकलच्या मोटारमनच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याची माहिती संबंधित विभागाला कळवली. त्यानंतर रूळदुरुस्ती करणाऱ्या पथकाने घटनास्थळी जाऊन रुळाची डागडुजी केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या घटनेमुळे लोकलबरोबरच पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस खोळंबून राहिल्याने मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Break the Rule during the Khadavali-Titwala; Half an hour detour, commute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.